विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस हे सध्या कोविड सेंटरवर भेटी देण्याच्या दौऱ्यावर आहेत. तेथे जाऊन ते रुग्णालयातील उपाययोजना आणि रूग्णांबद्दल आढावा घेत आहेत. नाशिकमधील जिल्हा सामान्य रूग्णालय, कोविड केअर सेंटर येथे फडणवीसांनी भेटी दिल्यानंतर विभागीय आयुक्त कार्यालयात आढावा बैठक घेतली. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी सामनाच्या टीकेला फडणवीसांनीही जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
“महाविकास आघाडीनं पाच वर्षे जरूर सरकार चालवावं, त्यांना शुभेच्छा आहेत; पण सामना एवढा अंतर्विरोध कुठेच झाला नाही, असे फडणवीस म्हणाले. ‘सामना’ रोज आपली भूमिका बदलतो. कधी पवारसाहेबांच्या विरोधात असते, तर कधी बाजूने.त्यांना स्वतःचा बेसच नाही”, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
तसेच, फडणवीस यांनी ‘सामना’च्या भूमिकेवर बोलताना बाळासाहेबांच्या वेळेसचा सामना, अशी दुटप्पी भूमिका मांडणारा नव्हता असेही म्हटले आहे. हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचा सामना आता शिल्लक नाही. तोही अंतर्विरोधाने ग्रासला आहे. आदरणीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांच्या ‘सामना’ची काय अवस्था आहे? भूमिका नसलेला सामना अशा शब्दांत फडणवीसांनी सामनावर टीका केली