IMPIMP

बालेवाडीत होणार “भव्य अटलसेवा महाआरोग्य शिबीर”, मंत्री, आमदार, खासदार देखील राहणार उपस्थित

Atal Seve Mahaarodya Shibir

बालेवाडी : आरोग्य हीच सर्वात मोठी संपत्ती असून निरोगी आयुष्य हेच माणसांच्या जीवनाचे खरी महत्व आहे. त्यामुळेच खर्जिक आजारांवरती उपचार हे पूर्ण:त मोफत मिळावे, असा संकल्प ठेऊन भाजपचे शहर चिटणीस लहु बालवडकर यांनी भव्य अशा ‘अटलसेवा महाआरोग्य’ शिबीराचं आयोजन केले आहे. लहू बालवडकर सोशल वेलफेअर व ‘सनराईस मेडिकल फाऊंडेशन’ यांच्या संयुक्त विद्यमाने होणाऱ्या या शिबीराचं आयोजन येत्या २४ व २५ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ०९ : ३० वाजेपासून सायंकाळी ०५ : ०० वाजेपर्यंत ‘बालेवाडी, हायस्ट्रीट ग्राऊंड पुणे” येथे करण्यात आले आहे. त्याची जय्यत तयारी देखील पुर्ण झाली आहे.

हेही वाचा…उत्साहपूर्ण वातावरणात अजिंठा – वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा समारोप संपन्न 

२४ जानेवारीला  राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील रोजी तर केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते २५ जानेवारी रोजी ‘अटल सेवा महाआरोग्य’ शिबीराचे उद्घाटन होणार आहे. अटल सेवा महाआरोग्य शिबीराचे वैशिष्ट्ये म्हणजे सर्व तपासण्या आणि शस्त्रक्रिया अगदी मोफत होणार आहेत. यासाठी मुंबई, पुणे आणि पिंपरी चिंचवड येथील ६० नामांकित रूग्णालय आणि तज्ञ डॉक्टर सहभागी होणार आहेत.

जर्मन टेक्नॉलॉजी मशीनच्या सहाय्याने ३८ आजारांवरील रक्त चाचण्या ज्याला १५००० रूपये मोजावे लागतात. त्या अगदी मोफत केल्या जाणार आहेत. यासह गुडघ्याचे तसेच मणक्याचे उपचार बिना शस्त्रक्रिया केली जाणारआहे. गुजरातमधील प्रसिध्द तज्ञ पन्नास डॉक्टारांच्या साह्याने प्राचीन निरोआयुर्वेदिक पद्धतीने खांदा दुखी, सांधेदुखी, खुबा शरीराच्या व्याधी शिबिरात कमी केल्या जाणार आहेत. मोफत चष्मे वाटप, मोफत औषध वाटप, कर्णबधीर व्यक्तींना मोफत श्रवण यंत्र वाटप आदी तापसण्या, चाचण्या अगदी मोफत केल्या जाणार आहेत.

हेही वाचा…उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सावंतवाडी महाअधिवेशनाचे निमंत्रण

या कार्यक्रमाला राज्यमंत्री माधुरी मिसाळ, राज्यमंत्री मेघनाताई बोर्डीकर, राज्यसभा खासदार डॉ. मेधाताई कुलकर्णी, आमदार योगेश टिळेकर, आमदार सुनील कांबळे, आमदार राहुल कुल, माजी आमदार जगदीश मुळीक, भाजपचे महामंत्री राजेश पांडे, भाजपच्या पुणे शहराच्या महिला अध्यक्षा हर्षदा फरांदे, सरचिटणीस पुनीत जोशी, माजी उपसभापती बाळासाहेब चांदेरे, माजी नगरसेवक ज्ञानेश्वर तापकीर, भाजपचे युवा मोर्चाचे अध्यक्ष करण मिसाळ, पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष सुमित भावे यांच्यासह अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी २५ जानेवारीला उपस्थित राहणार आहेत. तर आमदार महेश लांडगे, आमदार सिध्दार्थ शिरोळे, आमदार शंकर जगताप, आमदार शंकर मांडेकर, आमदार भीमराव तापकीर, भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे, उपाध्यक्ष संजय काकडे, डिजिटल मिडया संपादक पत्रकार संघटनेचे अध्यक्ष राजा माने, भाग संचालक सुभाष कदम २४ जानेवारीला आदी उपस्थित होणार आहेत.

दरम्यान, ज्येष्ठ नागरिक, सर्व महिला-पुरूष वर्ग, पत्रकार बंधु-भगिनी, विद्यार्थी, तरूण वर्ग, महिला बचत गट, सफाई कामगार वर्ग, महापालिका कर्मचारी वर्ग, तसेच पुण्यातील सर्व व्यक्तींनी या शिबीराला अवश्य भेट द्या. तसेच तुमच्या प्रत्येक आजारांवर याठिकाणी शस्त्रक्रिया, तपासण्या, चाचण्या,  मार्गदर्शन, अगदी मोफत केल्या जाणार आहेत. आपल्याला ही आरोग्य क्रांती अशीच पुढे घेऊन जायची आहे आणि प्रत्येकांचं आयुष्य निरोगी ठेवायचं आहे. त्यामुळे सर्वांनी या शिबिराचा अवश्य लाभ घ्या. असे आवाहन लहु बालवडकर यांनी केले आहे.

READ ALSO :

हेही वाचा…“अटलसेवा महाआरोग्य शिबीरात कॅन्सरवरील जगप्रसिद्ध टाटा मेमोरियल हॉस्पिटलचे ख्यातनाम डॉक्टर्सही होणार सहभागी” 

हेही वाचा…पालकमंत्र्यांचा तिढा मुख्यमंत्र्यांच्या दावोस दौऱ्यांनंतरच सुटणार का ? 

हेही वाचा…मोठी बातमी…! वाल्मिक कराडला पुन्हा १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी 

हेही वाचा…दावोसमध्ये महाराष्ट्राची विक्रमी गुंतवणूक..! इतक्या कोटींची झाली गुंतवणूक

हेही वाचा…ठाकरे गटाचे ४ आमदार अन् ३ खासदार फुटणार, बड्या नेत्याचा बडा दावा

 

 

 

Total
0
Shares
Previous Article
Asha Dange

दुसऱ्या शिक्षक साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कवयित्री आशा डांगे यांची निवड

Next Article
devendra fadnavis

पोलिसांची कॉलर शरमेने खाली गेली, फडणवीस साहेब कधी जबाबदारी घेणार ?

Related Posts
Total
0
Share