मुंबई – भाजपचे दिवंगत नेते आणि माजी केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांची आज पुण्यतिथी आहे. देशासह राज्यभरातील लाखो कार्यकर्ते गोपीनाथ मुंडे यांना विनम्र अभिवादन करत आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणींना उजाळा देत भावुक झाले आहे. लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यतिथीनिमित्ताने धनंजय मुंडे यांनी ट्वीट करत आठवणींना उजाळा देत आदरांजली व्यक्त केली आहे.
‘अप्पा, ऊसतोड बांधवांच्या कल्याणासाठी तुम्ही आयुष्यभर कष्ट केले. लोकसेवेचा तुमचा हा वसा आणि वारसा पुढे नेत असताना तुमच्याच नावाने ऊसतोड मजूर बांधवांसाठी महामंडळ सुरू केले आहे. मजूर बांधव आणि सर्व समाजासाठी तुम्ही पाहिलेली स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी आयुष्य वेचेन. हा शब्द देतो’ अशी ग्वाही धनंजय मुंडे यांनी दिली.
अप्पा, ऊसतोड बांधवांच्या कल्याणासाठी तुम्ही आयुष्यभर कष्ट केले. लोकसेवेचा तुमचा हा वसा आणि वारसा पुढे नेत असताना तुमच्याच नावाने ऊसतोड मजूर बांधवांसाठी महामंडळ सुरू केले आहे. मजूर बांधव आणि सर्व समाजासाठी तुम्ही पाहिलेली स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी आयुष्य वेचेन. हा शब्द देतो. 1/2 pic.twitter.com/S5Y86muXRx
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) June 3, 2021