कोल्हापूर: जस जशी मतदानाची प्रक्रिया जवळ येत आहे तसं तशी कोल्हापूर उत्तरेत राजकीय जुगलबंदी आणखी रंगतदार होताना दिसत आहे. कोल्हापूर ऊत्तरेत भाजप आणि महाविकास आघाडीने आपली पूर्ण ताकद उतरवलेली दिसत आहे. काहीही झाले तरी विजय आपलाच असं दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून आणि नेत्यांकडून पाहायला मिळत आहे.
राजकीय वातावरण तापलं; शरद पवारांवर झालेली टीका अन् राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून प्रत्यत्तर
भाजपचे नेते आणि माजी खासदार धनंजय उर्फ मुन्ना महाडिक यांनी सत्यजित कदम यांच्या प्रचारात महिलांविषयी एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे, ज्याचा फटका आता भाजपला या निवडणुकीत बसू शकतो.
” वरुण गांधींशी राजकीय भेट नव्हती, मात्र चर्चा झाली”; संजय राऊतांच्या दाव्याने खळबळ
काँग्रेसच्या उमेदवाराबद्दल बोलताना धनंजय महाडिक यांनी म्हटलं आहे काँग्रसचे लोक येतील आणि तुम्हाला सांगतील आम्ही एक महिला उभी केली आहे. ती महिला चांगली आहे, बिचारी आहे. तुम्ही सगळ्या महिला आहात आणि एका महिलेला निवडून आण्यासाठी आवाहन करतील. जर तुमचा पती समजा एखादा प्लम्बिंग वाला असेल किंवा इतर काही क्षेत्रात काम करत असेल तर ते तुमहाला येईलच असं काही नाही. तुमचा पती इलेक्ट्रिशियन असेल तुम्हाला ते काम जमणार आहे का ? ज्याचं काम त्यानं करायचं असतं, ते दुसऱ्याला जमत नाही असं वक्तव्य धनंजय महाडिक यांनी केल्याने आता तणाव वाढण्याची शक्यता आहे.
हजारो कोटींचा घोटाळा! दरेकरांना जेलमध्ये टाकलं पाहिजे; आपचे नेते धनंजय शिंदे
धनंजय महाडिक यांचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता काँग्रेसकडून आंदोलन करण्यात येणार आहे. कोल्हापुरात आज या वक्तव्याचा निषेध म्हणून काळे ड्रेस आणि काळी साडी परिधान करून महिलांकडून आंदोलन केले जाणार आहे. कावळा नाका परिसरात हे आंदोलन होणार आहे.
Read also:
- अजित पवार अतिशय हुशार राजकारणी, ते बरोबर वेळ मारून नेतात; चंद्रकांत पाटलांचा पवारांना टोला
- कोल्हापुर पोटनिवडणुकीसाठी यंत्रणा सज्ज; 15 उमेदवारांसाठी 2 हजार 200 कर्मचाऱ्यांची नियक्ती
- शरद पवार, युपीएचं अध्यक्ष पद; राष्ट्रवादीच्या नेत्याची महत्वाची प्रतिक्रिया, म्हणाले..;
- हजारो कोटींचा घोटाळा! दरेकरांना जेलमध्ये टाकलं पाहिजे; आपचे नेते धनंजय शिंदे
- गली गली मैं शोर है,प्रवीण दरेकर चोर है! दरेकरांच्या राजीनाम्यासाठी आपचा मुंबईत एल्गार