मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप झाल्यानंतर राज्याच्या राजकारणात वादळ उठले आहे. मुंडे यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळले असले, तरीही आरोप करणाऱ्या महिलेच्या बहिणीसोबत परस्पर सहमतीने संबंधात होतो, असा खुलासा केला आहे.
आपल्या संबंधांबाबत कुटुंब व मित्र परिवाराला देखील माहिती होती, असे मुंडे यांनी म्हटले आहे. मात्र आता भाजपने यावरून आक्रमक भूमिका घेतली असून, भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा उमा खापरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहित राजीनाम्याची मागणी केली आहे.
सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे जींनी ताबडतोब राजीनामा द्यावा – भाजप महिला मोर्चा प्रदेश अध्यक्ष उमाताई खापरे @KhapreU @BJP4Maharashtra @Dev_Fadnavis @ChDadaPatil @mipravindarekar @cbawankule @SMungantiwar @PravinAlai @keshavupadhye @Madhavbhandari_ pic.twitter.com/zDACY5icmV
— Sainath Shirpure ( साईनाथ शिरपुरे ) (@SaiShirpure) January 12, 2021
सामाजिक न्याय खात्यासारख्या अतिमहत्त्वाच्या कॅबिनेट मंत्रिपदाची जबाबदारी आपण गंभीर आरोप असलेल्या बेजबाबदार व्यक्तीवर टाकलेली आहे. वरील घटनेमुळे निश्चितच समाजावर त्याचा विपरित परिणाम होणार आहे. वस्तुस्थितीचे गांभीर्य ओळखून आपण कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांचा त्वरित राजीनामा घ्यावा, अशी मागणी खापरे यांनी केली आहे.
राजीनामा न घेतल्यास भाजपा महिला मोर्चा आपल्या सरकारविरुद्ध सदर मंत्र्याच्या राजीनाम्यासाठी व कायदेशीर कारवाईसाठी तीव्र आंदोलन छेडेल, असा इशारा देखील त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिला आहे.
Read Also :
- मृत्यूपर्यंत लढा देणार, ढोंगीला शिक्षा मिळणारच; मुंडेंवर आरोप करणाऱ्या महिलेचे ट्विट
- … तरीही पुणे महापालिका आम्हीच जिंकणार, चंद्रकांत पाटलांचा निर्धार
- राजकारणातील घराणेशाही लोकशाहीचा सर्वात मोठा शत्रू, मोदींची काँग्रेसवर अप्रत्यक्ष टीका
- उद्योगांचे वीजदर कमी करण्यासाठी प्रयत्न करणार, ऊर्जामंत्र्यांची ग्वाही
- कोरोनाच्या लढाईत पंतप्रधान मोदींचे काम जगात सर्वोत्तम – फडणवीस