बीड : राष्ट्रवादीचे आमदार व माजी मंत्री धनंजय मुंडे आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्यातला राजकीय संघर्ष अवघ्या महाराष्ट्राला माहित आहे. मात्र, परळीमध्ये एका कार्यक्रमात दोघेही एका मंचावर दिसले. यावेळी बहिण-भावात चांगलीच टोलेबाजी पाहायला मिळाली. बहिणीने दिलेला चेक तो बाउन्स होऊ देणार नाही, अशी मिश्किल टिप्पणी केली. त्यामुळे सभागृहात एकच हश्शा पिकली.
परळीची सुवर्ण कन्या श्रद्धा गायकवाड हिच्या नागरी सत्कार सोहळ्यात दोघांनाही संयोजकांनी बोलवले होते. परळी येथील कार्यक्रमात पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे एकाच मंचावर पाहायला मिळाले. त्यावेळी दोघांमध्ये टोलेबाजी पाहायला मिळाली.
श्रद्धा तुला गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान कडून ब्लॅक चेक देते. जेवढी रक्कम तिला हवी आहे. तेवढी त्यांनी टाकावी फक्त चेक बाउन्स झाला नाही पाहिजे एवढी रक्कम टाकावे, असं वक्तव्य पंकजा मुंडेंनी केलं.
पंकजाताईंनी आता श्रद्धाला चेक दिला आहे, असं धनंयज मुंडे म्हणाले. एवढ्यातच पंकजा मुंडेंनी त्यात पैसे टाका असं म्हणाल्या. त्यामुळे सभागृहात एकच हश्शा पिकली.
जरी त्या अकाउंट मधील पैसे कमी पडले, तर मी टाकेल अजून ही टाकत आहे. बहिणीने चेक दिला असला तरी भाऊ तो बाउन्स होऊ देणार नाही, काळजी करू नको, असं धनंजय मुंडे म्हणाले. यानंतरही सभागृहात हश्शा पिकली.
अहमदाबाद (गुजरात) येथे पार पडलेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत “स्केट बोर्ड” या क्रीडा प्रकारात सुवर्णपदक पटकावून ऑलिम्पिक स्पर्धेसाठी पात्र ठरलेली परळीची कन्या श्रध्दा रविंद्र गायकवाड हिचा आज समस्त परळीकरांच्या वतीन गौरव केला. (१/३)#परळी pic.twitter.com/j86eMXQvUl
— Pankaja Gopinath Munde (@Pankajamunde) November 14, 2022
नुकत्याच अहमदाबाद येथे संपन्न झालेल्या स्केट बोर्डिंगच्या राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक कमावत ऑलिम्पिक स्पर्धेत आपले स्थान निश्चित केलेली परळीची सुवर्णकन्या कु. श्रद्धा गायकवाड या लेकीचा समस्त परळीकरांनी एकत्र येत गौरव केला.या सोहळ्यास उपस्थित राहून श्रद्धाच्या जिद्दीचे कौतुक केले pic.twitter.com/4SexoTWDJd
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) November 14, 2022