परळी : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत माजी मंत्री आणि आमदार धनंजय मुंडे यांनी शपथ पत्रात करुणा शर्मा यांच्या मिळकतीबाबत उल्लेख केला नव्हता. त्यामुळे करुणा शर्मा यांनी ऑनलाईन तक्रार दाखल केली होती. या तक्रारीवर आज परळी न्यायालयात सुनावणी होणार असून, सुनावणीपूर्वीच करुणा शर्मा यांनी मोठा दावा केला आहे.
हेही वाचा…कार्यकर्त्यांची पोलिकांकडून धरपकड, राजू शेट्टींच्या घरी पोहचला पोलिसांचा ताफा
करुणा शर्मा यांनी म्हटले की, “धनंजय मुंडेंनी २०० बूथ कॅप्चर केले आहेत. निवडणुकीत माझे नाव टाकले नाही, आमच्या केसचा संदर्भ दिला नाही. २०१४ पासून माझे आणि माझ्या मुलांचे नाव त्यांनी शपथपत्रात नमूद केले नाही. २०२४ मध्ये मुलांचे नाव दिले पण माझे नाव गायब केले. या सर्व प्रकरणावर माझी लढाई सुरू आहे.” त्यांनी पुढे असेही सांगितले की, “धनंजय मुंडेंचे वॉरंट निघेल आणि त्यांना सहा महिन्यांची शिक्षा होईल. मी आधीच सांगितले होते की, मंत्रीपद जाणार आणि तसेच झाले. आता मी सांगते की, सहा महिन्यात त्यांची आमदारकीही जाईल.”
हेही वाचा…शरद पवारांनी पत्राद्वारे मोदींचे मानले आभार, पत्रात नेमकं काय ?
याचवेळी त्यांनी महाराष्ट्रातील भ्रष्टाचाराचा मुद्दाही उपस्थित केला. कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेवर नाशिक सत्र न्यायालयाने स्थगिती दिली. यावर भाष्य करताना करुणा शर्मा म्हणाल्या की, “भ्रष्ट लोकांना मंत्रालयात बसवले तर न्याय कसा मिळणार? कोकाटे यांना शिक्षा दिल्यास त्यांच्या मतदारसंघात पुन्हा निवडणूक घ्यावी लागेल, त्यामुळे सरकारी निधीचा मोठा खर्च होईल, असे न्यायालयाने निरीक्षण नोंदवले आहे. मात्र, लोकांच्या पैशांचा गैरवापर टाळण्यासाठी भ्रष्ट मंत्र्यांवर कारवाई होणे आवश्यक आहे.” त्यांनी सांगितले की, “मी माझ्या पक्षाच्या माध्यमातून हा मुद्दा घेऊन याचिका दाखल करणार आहे.”
शिरूर येथे आमदार सुरेश धस यांचे कार्यकर्ते सतीश भोसले उर्फ खोक्या भोसले यांच्या अनधिकृत घरावर प्रशासनाने कारवाई करत घर पाडले. यानंतर अज्ञातांनी त्या घराला आग लावल्याचा आरोप भोसले यांच्या नातेवाईकांनी केला आहे. यावर प्रतिक्रिया देताना करुणा शर्मा म्हणाल्या, “कोणाचेही घर तोडणे, जाळणे हा कुणाचाही अधिकार नाही. पण, जर घर तोडायचेच असेल, तर मग मंत्री आणि आमदारांची घरेही तोडा. ही माणसे तरुण पिढीला गुंड प्रवृत्तीमध्ये नेत आहेत. बीड जिल्ह्याची परिस्थिती बिकट होती, मात्र आता पोलीस अधीक्षकांनी कठोर पावले उचलली पाहिजेत.”
श्रावणी बाळा..!’या नालायक राक्षस लोकांनी ; मुंडेंचा उल्लेख करत शिक्षकाने उचचलं टोकाचं पाऊल
हेही वाचा…महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा वादाच्या भोवऱ्यात ; संघटनेकडून रोहित पवारांना सवाल
हेही वाचा…बीडच्या गंभीर लोकांना मोठं करण्यामागे पवारांचाही हातभार ; अंजली दमानियांचा जोरदार पलटवार