सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांचा काल वाढदिवस होता. धनंजय मुंडे यांनी राज्यभरातून अनेक शुभेच्छा मिळाल्या. आज पवार त्यांनी पवार कटुंबासह आपल्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन केले. “सुप्रियाताईंनी केक आणला आणि पवार साहेबांनी तो भरवला” याचा आनंद धनंजय मुंडेंनी व्यक्त केला आहे. सुप्रिया सुळे यांनीही ट्विट करत या सेलिब्रेशनचा व्हिडीओ ट्विटरद्वारे पोस्ट केला आहे.
Happy Belated Birthday Dhananjay! 🥳 🎂 🍰@dhananjay_munde pic.twitter.com/mxcy89AwrZ
— Supriya Sule (@supriya_sule) July 16, 2020
“कोरोनामुक्त झाल्यानंतर पहिल्यांदाच बारामती येथे आदरणीय शरद पवार साहेबांची भेट घेतली. सुप्रिया सुळे ताईंनी काल झालेल्या वाढदिवसानिमित्त केक आणला. राष्ट्रवादी हे कुटुंब आहे. या कुटुंबाचा ‘आधारवड’ कायम कुटुंबासाठी भक्कम उभा असतो. धन्यवाद साहेब, ताई ! असाच आशीर्वाद राहू द्या” असे ट्वीट धनंजय मुंडेंनी केले आहे.
कोरोनामुक्त झाल्यानंतर पहिल्यांदाच बारामती येथे आदरणीय @PawarSpeaks साहेबांची भेट घेतली. @supriya_sule ताईंनी काल झालेल्या वाढदिवसानिमित्त केक आणला. @NCPspeaks हे कुटुंब आहे. या कुटुंबाचा 'आधारवड' कायम कुटुंबासाठी भक्कम उभा असतो. धन्यवाद साहेब, ताई ! असाच आशीर्वाद राहू द्या🙏 pic.twitter.com/a6czzA9W8n
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) July 16, 2020
दरम्यान, “यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर माझा वाढदिवस साजरा करु नका. कोणीही शुभेच्छा देण्यासाठी येण्याचा प्रयत्न करु नये. कुटुंबाची आणि स्वतःची काळजी घ्या,” असे आवाहन धनंजय मुंडे यांनी आधीच कार्यकर्त्यांना केलं होतं.