मुंबई : गेल्या दोन महिन्यांपासून मंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणी सातत्याने वाढत चालल्या आहेत. सुरूवातीला संतोष देशमुख हत्या प्रकरणात मुख्य आरोपी असलेल वाल्मिक कराड यांच्याशी त्यांचं नाव जोडलं जात आहे. त्यावरून त्यांनी मंत्री पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी केली जात आहे. तर कृषी मंत्री असतांना धनंजय मुंडे यांनी कृषी विभागात सर्वात मोठा भ्रष्टाचार केल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला आहे.
हेही वाचा…“महायुतीच्या नीट बातम्या द्या, नाहीतर…” हाती AK 47 बंदूक हाती घेत अजितदादांचा इशारा
राज्य सरकारच्या MAIDC (महाराष्ट्र अॅग्रिकल्चरल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन) द्वारे खरेदी करण्यात आलेल्या बैटरी पंपांच्या किमतीत मोठी तफावत आढळली आहे. मिळालेल्या माहितीनुसार MAIDC स्वतः बैटरी पंप ₹2190/- रूपयांना खरेदी करत होते. त्यावर GST धरला तर किंमत ₹2453/-इतकी होत होती. मात्र कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या कार्यकाळात हेच पंप तब्बल ₹3425/- ला खरेदी करण्यात आले, असा गंभीर आरोप अंजली दमानिया यांनी केला आहे.
तसेच MAIDC स्वतः ₹2190/- ला खरेदी करत असलेले पंप, सरकारने ₹3425/- ला का घेतले? GST सहित किंमत ₹2453/- इतकी असताना दरामध्ये एवढी वाढ कशासाठी? असा सवालही त्यांनी केला आहे. या व्यवहारामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा संशय देखील त्यांनी व्यक्त केला आहे.
विरोधकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थेट लक्ष्य केले असून हा भ्रष्टाचार उघड झाल्यानंतर सरकारकडून काय कारवाई केली जाणार? असा सवाल उपस्थित केला आहे. राज्य सरकारकडून या आरोपांवर अधिकृत स्पष्टीकरण अद्याप आलेले नाही. धनंजय मुंडे यांच्या अडचणी वाढणार? या घोटाळ्यामुळे तत्कालीन कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर चौकशीचा दबाव वाढला आहे. विरोधकांनी तपास आणि तत्काळ कारवाईची मागणी केली आहे. सरकारकडून या प्रकरणावर काय भूमिका घेतली जाते, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा…“तोच विनोद पुन्हा-पुन्हा..”, राहुल गांधींच्या दाव्यावर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
हेही वाचा…भाजपने चिटींग करून महाराष्ट्रात निवडणूक जिंकली..! राहुल गांधींनी थेट पुरावाच दिला
हेही वाचा…ठाकरे गटाच्या खासदारांची वज्रमुठ, पत्रकार परिषद घेत जाहिर केली भूमिका
हेही वाचा…९० दिवसात टप्प्या टप्प्याने प्रवेश होणार..! उदय सामंतांनी सांगितली आतली बातमी
हेही वाचा…ठाकरे गटातील कोणते ६ खासदार शिंदे गटात जाणार ? उद्धव ठाकरेंवर पुन्हा एकदा धर्मसंकट ?