पुणे : ” गुन्हेगारांना होर्डिंग लावायला मी सांगितलं होतं का? आम्ही आमच्या सदसद्विवेक बुद्धीला स्मरुन आवाहन केलं आहे. जर कोणी काही केलं असेल तर पोलिसांनी कारवाई करावी. त्यांना कधीच बंदी घालण्यात आलेली नाही. मी पिपंरी चिंचवडमध्ये आज आलेलो नाही. माझी मतं पिपंरी चिंचवडकरांना स्पष्ट माहित आहेत. तुम्ही काहीतरी नविन मुद्दा काढण्यासाठी प्रश्न काढायचा हे धंदे बंद करा. अनिधकृत होर्डिंग लावावं हे मी सांगितलं नाही. मी फार नियमांच पालन करणारा माणूस आहे. होर्डिंग जर चूकीची लागली असतील तर भाजपाची इथे सत्ता आहे. तिथल्या आयुक्तांनी आणि महापौरांनी कारवाई करावी” असे म्हणत अजित पवार पदाधिकाऱ्यांवर चांगलेच संतापले.
भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी केले देवेंद्र फडणवीसांना नव्या पुण्याचे शिल्पकार
अजित पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस २२ जुलै रोजी असतो. त्यानिमित्ताने दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांकडून होर्डिंग लावण्यात आले आहेत. आगामी महापालिका निवडणुकीचं वर्ष लक्षात घेता, भाजपाकडून देवेंद्र फडणवीस यांचे ‘नव्या पुण्याचे शिल्पकार’ म्हणून होर्डिंग लावले गेले, या होर्डिंग्जला राष्ट्रवादी काँग्रेसने ‘कारभारी लयभारी’ने उत्तर दिलं आहे. या पोस्टर वॉरची शहरभर चर्चा रंगली आहे. त्यावर उत्तर देताना अजित पवार चांगलेच भडकले.
पुण्याचे खरे शिल्पकार कोण? बॅनरबाजीच्या लढाईत भाजप-राष्ट्रवादीने शहराला हरताळ फासले
दोन्ही नेत्यांनी हे आदेश दिल्यानंतरही शहरात जागोजागी दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून नेत्यांना शुभेच्छा देणारे फलक उभारण्यात आले आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांनीच नेत्यांचे आदेश धुडकाविल्याचेही स्पष्ट झाले आहे. प्रमुख चौकात, रस्त्यांवर फलक उभारून आपापल्या नेत्यांनी शहराचा विकास के ल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र, फलकांमुळे शहराचे विद्रुपीकरण होत आहे. कार्यकर्त्यांनी उभारलेल्या या शुभेच्छा फलकांवर महापालिकेकडून कारवाई होणार का, हा प्रश्नही यानिमित्ताने उपस्थित झाला आहे. दरम्यान, या बॅनरबाजीमुळे नव्या पुण्याचे खरे शिल्पकार कोण?, या प्रश्नाला उत्तर देण्यासाठी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप २२ तारखेनंतर माध्यमांना मुलाखत देणार आहेत.
Read Also :
- मनसेने महापालिकेला घोषीत केले ‘कैलासवासी पुणे महानगरपालिका’ ; सत्ताधाऱ्यांच्या ढिसाळ कारभारावर निशाना
- नागपूर महापालिका निवडणुकीसाठी भाजपची रणनिती, ‘फ्रेश’ चेहऱ्यांणा मिळणार संधी
- मोठी बातमी! अखेर “या” कारणासाठी महाविकास आघाडीतून बाहेर पडणार काँग्रेस
- पुण्याचे खरे शिल्पकार कोण? बॅनरबाजीच्या लढाईत भाजप-राष्ट्रवादीने शहराला हरताळ फासले
- “विरोधकांकडून भारतीय लोकशाहीला बदनाम करण्याचा कट”, पिगॅसस प्रोजेक्टवरून फडणवीसांचा गंभीर आरोप