मुंबई : २६ ऑगस्टला राष्ट्रवादी कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, उपमुख्यमंत्री अजित पवार, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत, सटाणा व हिंगोली शहरातील विविध पक्षातील कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर पक्षप्रवेश केला. त्यामुळे, आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे बळ नक्कीच वाढले आहे.
नाशिक-हिंगोलीत राष्ट्रवादीलासांगलीच्या पालकमंत्री पदावरून जयंत पाटलांना हटवा! भाजपची आक्रमक मागणी
हिंगोलीचे आमदार राजू नवघरे व सटाणाचे माजी आमदार संजय चव्हाण यांच्या पुढाकाराने चंद्रकांत दळवी, अशोक दळवी, प्रल्हाद इंगोळे, नानाराव जामगे, दिलीप पाटील, मनोज सोनावणे, श्रीपाद कायस्य, नितिन सोनावणे, जीवराज चौधरी, आनंद सोनावणे आदींनी पक्षात प्रवेश केला. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर, युवक कार्याध्यक्ष सूरज चव्हाण उपस्थित होते.
हिंगोलीचे आमदार राजू नवघरे व सटाणाचे माजी आमदार संजय चव्हाण यांच्या पुढाकाराने चंद्रकांत दळवी, अशोकराव दळवी, प्रल्हाद इंगोळे, नानाराव जामगे, दिलीप पाटील, मनोज सोनावणे, श्रीपाद कायस्य, नितिन सोनावणे, जिवराज चौधरी, आनंद सोनावणे आदी मान्यवरांचा पक्षात प्रवेश झाला. pic.twitter.com/AsMbCeQjmx
— NCP (@NCPspeaks) August 26, 2021
दुसरीकडे, आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसकडून जोराने मोर्चेबांधणी सुरू असून, २५ ऑगस्टला, फेब्रुवारी २०२२ मध्ये मुदत संपणाऱ्या महापालिकांच्या प्रारुप प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार करण्याबाबत राज्य निवडणूक आयोगाने आदेश जारी केले आहेत. या पार्श्वभूमीवर आता सोलापुरात मोठी घडामोड घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
“…तर ईट का जवाब पत्थर से देंगे,” बावनकुळेंचा शिवसेनेला इशारा
२६ ऑगस्टला वंचितचे प्रदेश प्रवक्ते व नगरसेवक आनंद चंदनशिवे यांनी, शहरातील विविध विकासकामांच्या निमित्ताने मुंबईमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भेट घेतली आहे. त्यामुळे, ते राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची चर्चा आता सुरु झाली आहे. त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यास, सोलापूर महापालिकेत राष्ट्रवादीचे बळ वाढण्यात नक्कीच मदत होणार आहे.
Read Also :
- शिवसेना- भाजपच्या वादाची काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे कोल्हे मजा घेत आहेत – सदाभाऊ खोत
- भावना गवळींना खावी लागणार जेलची हवा, भुजबळांनाही होणार ७ वर्षांची शिक्षा!
- एक सदस्यीय प्रभाग पद्धतीला भाजपचा विरोध, राजकीय संघर्ष निर्माण होण्याची शक्यता
- सोलापुरात वंचितला धक्का बसणार? मोठा नेता राष्ट्रवादीच्या वाटेवर!
- राणेंच्या अटकेसाठी दबाव टाकल्याचं सिद्ध झाल्यास राजकारणातून सन्यास घेईन – उदय सामंत