सध्या लॉकडाऊनमुळे लोक आर्थिक संकटात सापडले असले तरीही iPhoneप्रेमी हे फक्त iPhoneच वापरतात. त्यातही आता एक संधी आहे ती म्हणजे iPhone 11 हा सर्वात कमी किमतीत मिळणार आहे. लॉकडाऊनमुळे दुकाने बंद असली तरी शॉपिंग वेबसाईट चालू आहेत.
एक मोठा सेल Amazonवर सुरु झाला आहे. या सेलच्या माध्यमातून तुम्हाला तुमच्या आवडत्या ब्रॅण्ड्सचा फोन आणि इतर वस्तू घेता येतील. शनिवार (18 जुलै)च्या रात्री 12 पासून ते 25 जुलैपर्यंत हा सेल (Apple Days Sale) चालणार आहे.
कंपनीने दावा केला आहे की, iPhone 11 श्रेणी, Apple वॉच, MacBookवर सर्वात उत्तम ऑफर फक्त आम्ही देत आहोत.
जाणून घ्या या सेलचे वैशिष्ट्ये :-
- १) या सेलमध्ये iPhone11 62,900 रुपयांमध्ये मिळणार आहे.
- २) HDFC Bankच्या क्रेडिट कार्डचा वापर केला तर ४ हजार रुपयांची सूट.
- ३) या सेलमध्ये iPhone 8 प्लसच्या 64GBच्या फोनवर 500 रुपयांची सूट मिळेल. हा फोन 41,500 रुपयांना मिळणार
- ४) iPhone 7 सीरीजचे फोनही आकर्षक किंमतींमध्ये मिळणार आहे.
- ५) EMIसाठी आकर्षक पर्याय, नो कॉस्ट EMI, HDFCच्या क्रेडिट किंवा डेबिट कार्डचा वापर केल्यावरही सुट
- ६) Apple Series 3 साठी HDFCच्या क्रेडिट किंवा डेबिट कार्डचा वापर केला तर 1,000 रुपयांची सुट
- ७) Apple iPads वर 5,000 रुपयांपर्यंत सुट