पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्या बदलीची चर्चा सध्या नाशिकमध्ये सुरु आहे. IPS विश्वास नांगरे पाटील यांची मुंबईत बदली होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. नांगरे पाटलांच्या बदलीची अद्याप अधिकृत माहिती नसली, तरी कार्यकाळ संपल्याने त्यांच्या बदलीची चर्चा आहे.
डॅशिंग IPS म्हणून नांगरे पाटील यांची ओळख आहे. नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनीही नांगरे पाटील यांच्या बदलीचे संकेत दिले. मात्र अधिकृत अशी कोणतीही घोषणा अद्याप झालेली नाही.
विश्वास नांगेर पाटील यांची फेब्रुवारी 2019 मध्ये नाशिकच्या पोलीस आयुक्तपदी नियुक्ती झाली होती. नाशिकचे तत्कालिन पोलिस आयुक्त रवींद्र सिंघल यांच्या जागी नांगरे पाटील यांची नियुक्ती झाली होती. त्याआधी नांगरे पाटील हे कोल्हापूर परिक्षेत्राचे महानिरीक्षक म्हणून कार्यरत होते.