मुंबई : सुशांतसिंह राजपूत आणि दिशा सालियन मुद्दा पुन्हा एकदा तापला आहे. लोकसभेत शिंदे गटाचे लोकसभा नेते राहुल शेवाळे यांनी हा मुद्दा उपस्थित केला आहे. त्यावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलचं तापलं आहे. हा मुद्दा आज विधानसभेत देखील गाजला. शिंदे गटाचे नेते भरत गोगावले यांनी हा मुद्यावरून प्रश्न उपस्थित केले. त्यानंतर नितेश राणे यांनी देखील यावरून चौकशी करण्याची मागणी केली. त्यानंतर विधानसभेत मोठा गदारोळ बघायला मिळाल्याने तालिका अध्यक्षांनी सभागृह दहा मिनिटांसाठी तहकुब केला.
“जनतेच्या पैश्यांची रेवडी करून मुठभर लोकांच्या घश्यात घातली”; राष्ट्रवादीचा गंभीर आरोप
काल राहुल शेवाळे यांनी लोकसभेत सुशांतसिंह राजुपत केसबाबत भाष्य केलं. ड्रग्स संदर्भातल्या चर्चेत मी सहभाग घेतला. सुशांत केस तपास माहिती जनतेला मिळायला हवी. रिया चक्रवर्तीला जे कॉल आले होते ते एयु यावरून आले होते, पण मुंबई पोलिसांनी त्याचा खुलासा केला नाही, पण बिहार पोलिसांनी आदित्य ठाकरे यांच्या नावाचा उल्लेख केला आहे. असा प्रश्न उपस्थित केला.
“तर आधी राजीनामा द्या, मग काय घाण करा”; राज ठाकरेंची कार्यकर्त्यांना ताकीद
यावरून यावरून नितेश राणे यांनी सभागृहात प्रकरणावरून अनेक सवाल केले, याप्रकरणची संपुर्ण चौकशी तातडीने झाली पाहिजे. तसेच या प्रकरणासंदर्भात अनेक गोष्टी का लपवल्या जात आहेत. त्याचे उत्तर दिलं पाहिजे. तसेच यावरून कुणाला वाचवलं जातंय. असा सवाल करीत त्यांनी आदित्य ठाकरेंवर अप्रत्यक्ष हल्ला केला.
राऊतांना ठेचण्याची धमकी देणाऱ्या बांगरांना सेनेचं प्रत्युत्तर, म्हणाले, “नुसती ईडी अन् सीबीआय..;”
दरम्यान, यावरून राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. काही दिवसांपुर्वी बिहार निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूचं राजकारण केलं गेलं. आदित्य ठाकरे यांच्यासह लोकांचं त्यात नाव आणण्याचा प्रयत्न केला गेला. तरीही आता हा विषय आणला. मुंबईच्या निवडणुकीत बिहारी मतदान असल्याने हे सुरू असल्याची टिका रोहित पवारांनी केली.
Read also
- “गुजरातला फॉक्सकॉन, महाराष्ट्राला पॉपकार्न”, विरोधकांची नवी घोषणा, परिसर दणाणला
- “मुंबई पालिकेत 1 कोटी रूपयात किती उंदिर मारले?” आशिष शेलारांचा सभागृहात सवाल
- फोन टॅपिंग प्रकरण..! अध्यक्षांनी चर्चा करण्याची थांबवली, विरोधकांचा सभागृह त्याग
- मोठी बातमी..! राऊतांच्या जामीन अर्जावर सही करणाऱ्यालाच शिंदेंनी पक्षात घेतलं
- “आमदारांच्या कपबशा टॉयलेट मध्ये धुतांनाचा व्हिडीओ व्हायरल”; राष्ट्रवादीचा खोचक टोला