मुंबई : महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सगळेच पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. असे असताना दुसरीकडे शिवसेनेत मात्र पद नियुक्त्यांवरून सध्या ईडीच्या कचाट्यात अडकलेले आमदार प्रताप सरनाईक व मीरा भाईंदर जिल्हाप्रमुख आणि जिल्हासंघटक यांच्यातील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. दरम्यान, या प्रकारामुळे शिवसेना नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे आणि आमदार प्रताप सरनाईक यांच्यातील देखील मतभेद समोर आल्याची चर्चा आहे.
‘गडहिंग्लज आणि पारनेर साखर कारखान्यात घोटाळे, उद्या ईडीला पुरावे देणार!
सरनाईक तीन वेळा आमदार म्हणून निवडून आले असून, मीरा भाईंदरचे सेनेचे संपर्कप्रमुख आहेत. पण महापालिकेत भाजपने एकहाती सत्ता मिळवल्याने, महापालिका व संघटनेत सरनाईक यांना स्वतःचे वर्चस्व ठेवता आले नाही. परंतु, यामुळे गटबाजी वाढली आणि एकीकडे ईडीच्या फेऱ्यात सरनाईक अडकले असताना दुसरीकडे जिल्हाप्रमुख प्रभाकर म्हात्रे व जिल्हासंघटक स्नेहल सावंत यांनी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते अनेकांना शिवसेनेची पदं नियुक्तीची पत्रं वाटप केली.
भाजपकडून राज्यसभेच्या जागेसाठी काँग्रेसला आव्हान, दिला नवा उमेदवार
त्यांनतर या गोष्टीची माहिती सरनाईक यांना लागताच त्यांनी, पालकमंत्री तथा शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आलेली पदे संपर्कप्रमुख या नात्याने रद्दबातल ठरवली. मात्र, जिल्हाप्रमुख व जिल्हासंघटक यांनी संदेश जारी करत शिंदेंच्या आदेशाचा उल्लेख करून, त्या नियुक्त्या ग्राह्य असल्याचे स्पष्ट केले. दरम्यान, सरनाईकांच्या या व्हायरल पत्रप्रपंचमुळे सेनेतील अंतर्गत भेद चव्हाट्यावर आले आहेत.
‘चप्पल दाखवणं सोप्पं, ईडीला फेस करणं कठीण! तोंडाला फेस येईल’ पाटलांचा टोला
दरम्यान, त्या पत्रात सरनाईक यांनी म्हटले आहे की, ‘पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व इतर वरिष्ठ नेत्यांना न कळवताच स्वतःच्या लेटरहेडचा बेकायदेशीर वापर करून परस्पर नियुक्त्या केल्या गेल्या आहेत. त्यामुळे पक्षात वादविवाद सुरू झाले असून, त्याची तक्रार मी वरिष्ठांना केली आहे. याची त्यांनी गंभीर दखल घेतली आहे. सामनात प्रसिद्ध झालेल्या पदांव्यतिरिक्त इतर सर्व नियुक्त्या बेकायदेशीर आहेत. त्या पक्षाच्या शिस्तीत न बसणाऱ्या असल्यानेच संपर्क प्रमुख म्हणून त्या मी रद्द करत आहे.
Read Also :
- देवेंद्र फडणवीस दबंग नेते, १०० अजित पवारांना खिशात घालून फिरतात – चंद्रकात पाटील
- कुणी ऑफर दिली मुश्रीफांसाहेबांना? आम्ही काय ऑफर लेटर घेऊन फिरत असतो काय? – फडणवीस
- ‘पुढच्या आठवड्यात मुश्रीफांचा तिसराही घोटाळा बाहेर आणणार!’
- उद्धव ठाकरे अन् रश्मी ठाकरेंच्या बेनामी मालमत्तेच्या चौकशीसाठी अलिबागला जाणार – किरीट सोमय्या
- २ काँग्रेस नेत्यांचेही घोटाळे बाहेर येणार! पाटलांच्या विधानाने खळबळ