मुंबई : संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरु झाल्यापासून, संसदेचं कामकाज एकही दिवस सुरळीत झालं नाहीये. यातच बुधवारी मोदी सरकारकडून संसदेत इन्शुरन्स बिल मांडायला सुरवात झाल्यानंतर, विरोधकांनी विधेयकाची प्रत फाडून त्याचे तुकडे सगळीकडे फेकले आणि सभागृहात अभूतपूर्व असा गदारोळ झाला. राज्यसभेत मार्शलला पाचारण करण्यात आले, धक्काबुक्की झाली.
संसदेत महिला सदस्यांना धक्काबुक्की, ही लोकशाहीला अशोभनीय घटना; राष्ट्रवादीची प्रतिक्रिया
दरम्यान, विरोधकांनी मोदी सरकारच्या या कृतीचा आंदोलन छेदून निषेध नोंदवला. तसेच, पुरुष मार्शलला बोलवून महिला खासदारांना धक्काबुक्की करण्यात आली, असा गंभीर आरोपही विरोधकांनी केला. शिवसेना खासदार संजय राऊत, तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी यावरुन नाराजी व्यक्त करत, “माझ्या ५५ वर्षाच्या संसदीय कारकिर्दीत मी असं कधीच पाहिलं नाही,” अशी प्रतिक्रिया दिली.
“आम्हाला वाटले आम्ही हिंदुस्तान-पाकिस्तानच्या सीमेवर आहोत, ही कसली लोकशाही?”
या पार्श्वभूमीवर आता भाजपकडूनही विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला जात असून, राज्यसभेचे सभागृहनेते पीयूष गोयल यांनी पवारांनी केलेल्या गंभीर टीकेवर, “पवार यांनी झाल्या प्रकाराची खरी माहिती घेऊन स्वतः आत्मपरीक्षण करावे. विरोधकांनी मार्शलना धक्काबुक्की केली, टेबलावर उभे राहून गोंधळ घातला, नियमपुस्तक फेकले, हे त्यांनी पाहिले नाही का? त्यांनी याचा निषेध केला नाही, म्हणजे ते या कृतीचे समर्थन करतात का?” असे सवाल त्यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केले.
“महाराष्ट्राच्या राजकारणात जातीयवाद राष्ट्रवादीच्या जन्मांनंतर वाढीस लागला,” राज ठाकरेंचे मोठे विधान
राज्यसभेत बुधवारी गोंधळादरम्यान महिला मार्शल्सना धक्काबुक्की करणाऱ्या विरोधी पक्षाच्या खासदारांचे व्हिडिओ जाहीर झाल्यानंतर काही मिनिटांतच केंद्रीय मंत्र्यांनी पत्रकार परिषद घेऊन, गोंधळ घालणाऱ्या खासदारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. तसेच, काँग्रेस आणि तृणमूलसह विरोधकांना लाज असेल, तर त्यांनी देशाची जाहीर माफी मागावी.’’ अशी घणाघाती टीकाही त्यांच्याकडून यावेळी करण्यात आली. ‘
Read Also :
- काँग्रेसशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी सोनिया गांधी संवाद साधणार, मुख्यमंत्री ठाकरेही होणार सामील
- बदल्यांसंदर्भात मंत्रालयात थेट सिल्वर ओक वरून कॉल? हॅलो, मी शरद पवार बोलतोय!
- माजी मंत्री संजय राठोड यांनी महिलेकडे केली शरीरसुखाची मागणी; पीडीत महिलेची पोलिसांत तक्रार
- राज्यात महाविकास आघाडीचा हातात-हात; जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना वाद विकोपाला
- राहुल गांधींना लोकसभेतून वर्षभरासाठी निलंबित करा – रामदास आठवले