पुणे : अभिनेत्री ऊर्फी जावेदच्या कपड्यावरून भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. सार्वजनिक ठिकाणी अर्धनग्न कपडे घालून फिरणाऱ्या ऊर्फीला फिरू देऊ नका. असं म्हणत चित्रा वाघ यांनी ऊर्फीच्या विरोधात रान माजवलं होतं. त्यावर ऊर्फीनेही प्रत्युत्तर दिल्याने हा वाद चांगलाच चिघळला होता. मात्र आता खुद्द चित्रा वाघ यांनी ऊर्फीचं कौतुक करत तिच्यावर आता टिका नको असं म्हटलं आहे.
अद्वय हिरेंच्या प्रवेशाबाबत भुसेंची प्रतिक्रिया म्हणाले, “ते माझ्याविरोधात उभे राहणार मग..”
माझा विरोध हा कोणत्या महिला किंवा तिच्या धर्माला नव्हता आणि नाहीच. तो तिच्या विकृतीला आहे. तसेच तुम्ही तिचं कधी तरी कौतुक केलं पाहिजे. कारण सध्या ती महिला पूर्ण कपड्यामध्ये दिसत आहे. त्यामुळे सारखं सारखं असू बोलू नका. कोणी तरी सुधरत असून आपण त्याचं कौतुक देखील केलं पाहिजे. आता तिने काही तरी ठरवलं असेल, ती सध्या चांगल्या कपड्यामध्ये दिसत आहे. त्याचे अनेक फोटो मला अनेक जण शेअर करीत आहेत. त्यामुळे आपण तेवढच म्हणण आहे की, चांगले कपडे घालं आणि फिर असंही त्या म्हणाल्या.
चिंचवड पोटनिवडणूक बिनविरोधसाठी आमदार लांडगेंचा पुढाकार! विरोधी पक्षाच्या शहराध्यक्षांना निवेदन
दरम्यान, चित्रा वाघ आणि ऊर्फी जावेदचं प्रकरण मागील काही आठवड्यापासून चांगलचं चर्चेत आलं होतं. या प्रकरणावर राज्यातील राजकीय नेत्यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली होती. तर चित्रा वाघ यांनी या प्रकरणात महिला आयोगाला देखील आत ओढलं होतं. तसेच ऊर्फीच्या विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा देखील नोंदवण्यात आला होता. मात्र आता ऊर्फीने आपल्या वेशभुषेत बदल केल्याने हा वाद मिटला असल्याचं चित्रा वाघ यांनी अलिकडे म्हटलं आहे.
Read also
- कसबा पेठ पोटनिवडणुक मनसेने लढवावीच,; मनसेच्या कार्यकर्त्यांची राज ठाकरेंकडे मागणी
- सत्यजीत तांबेंचा भाजप कनेक्शन, थेट भाजपच्या कार्यालयात जाऊन घेतली जिल्हाध्यक्षांची भेट
- “पोटनिवडणुकांमध्ये मतं कमी पडली तर तिकीट कापलं म्हणून समजा”, भाजपच्या माजी खासदाराचा नगरसेवकांना इशारा
- “तर त्यांनी हा खटला लवकर दाखल करावा,” इम्तियाज जलील यांचे सुभाष देसाईंवर धक्कादायक आरोप
- “एमआयएमशी युती झाल्यास आघाडीतून शिवसेना बाहेर पडणार का?” भाजप नेत्याचा सवाल