पुणे : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते देहूत, एका खाजगी दुकानाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी, त्यांनी केलेल्या एका वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. देहूतील एका कार्यक्रमात मंचावरून एकाने चंद्रकांत पाटील ‘माजी मंत्री’ असा उल्लेख केला. तेव्हा पाटलांनी ‘माजी मंत्री म्हणू नका, दोन-तीन दिवसात कळेल,’ असं म्हणत तर्क-वितर्काना उधाण आणलं. त्यामुळे आता पुन्हा एकदा अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत.
केंद्र सरकारने आमचे ३० ते ३२ कोटी रुपये अगोदर द्यावे – अजित पवार
राज्यातील महाविकास आघाडी साकार पडणार असं सातत्याने भाजपकडून सांगितलं जात. त्या पार्श्वभूमीवर आज चंद्रकांत पाटलांनी केलेल्या या विधानामुळे, भाजप महाविकास आघाडीला धक्का देण्याच्या तयारीत असल्याचं दिसून येत आहे. दुसरीकडे आज, मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांनी देखील, ‘मराठा मार्ग’ मासिकामधील संपादकीय लेखात, आगामी निवडणुकांसाठी ‘भाजपसोबत युती हाच पर्याय’ असल्याचं म्हटलं आहे.
दरम्यान, त्यांच्या या भूमिकेनंतर सगळीकडूनच आश्चर्य व्यक्त केले जात असून, त्यावर देखील चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘खेडेकर यांनी मुखपत्रातून तशी इच्छा व्यक्त केली आहे. याबाबत भाजपकडून कोणताही निर्णय घेण्यात आला नाहीये. त्यांची ऑफर काय बघून निर्णय घेतला जाईल,’ असं सूचक विधान केलं आहे. दरम्यान, विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनीही, ‘संभाजी ब्रिगेडच हे वक्तव असेल, तर स्वागतच आहे,’ असं मत खेडकर यांच्या वक्तव्यावर व्यक्त केलं आहे.
राज्याच्या राजकारणात होणार मोठी उलथापालथ? संभाजी ब्रिगेड-भाजप युतीचे संकेत!
मराठा सेवा संघाच्या ३२ व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने लिहिलेल्या या लेखात, संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांनी, ‘संभाजी ब्रिगेड-भाजपची युती हि सध्याच्या राजकारणाची गरज आहे. संभाजी ब्रिगेड म्हणजे ‘राष्ट्रवादीचं पिल्लू’ अशी अनेक वर्षे आमची हेटाळणी झाली. पण आता वेळ आली आहे, भूमिका घ्यायची. त्यानुसार संभाजी ब्रिगेडने या युतीचा विचार करावा. राजकारण हे राजकारणासारखं व्हावं आणि त्यासाठी आता भाजपचा पर्याय उरला आहे,’ असं म्हटलं आहे.
Read Also :
- स्वप्न पुर्ण झालं: लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकरांसह दिग्गजांचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश
- परमबीर सिंग यांना उच्च न्यायालयाचा झटका; याचिका फेटाळून लावली
- पत्नीला न सांगताच सासऱ्याच्या घरावर बुलडोझर चालविलेला; नितीन गडकरींनी सांगितला ‘तो’ किस्सा
- शिवाजीराव भोसले बँक घोटाळा प्रकरण, राष्ट्रवादीच्या आमदाराविरुद्ध ८ हजार पानांचं आरोपपत्र
- उद्धव ठाकरेंचा थेट आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री जगमोहन रेड्डीला फोन; नार्वेकराची लागली “या” पदावर वर्णी