बीड: ‘डॉ. भागवत कराड केंद्रात मंत्रीपद देण्यात आले. पंकजा मुंडे यांना संपूर्ण खतम करण्याचा हा डाव आहे. कराड हे गोपीनाथ मुंडेंच्या सावलीत वाढले, पण प्रीतम मुंडे यांचा विचार न करता कराड यांना मंत्री केले गेल. . भागवत कराड यांना केंद्रात मंत्रीपद देण्यात आले असल्याचा आरोप होत आहे.
हे पण वाचा: अजित पवारांचे दोन स्वीय सहाय्यक, खास पुणेकरांच्या समस्या सोडवण्यासाठी राष्ट्रवादी भवनात बसणार
कराड यांनी मराठवाड्यात ‘जनआर्शिवाद’ यात्रा काढण्याच्या सूचना पक्षाच्या वतीने देण्यात आल्या आहेत. या यात्रेचे नियोजन सुरू असले तरी, या यात्रेला बीड जिल्ह्यामध्ये पंकजा मुंडेसह कार्यकर्त्यांचा विरोध असल्याचे बोलले जात आहे.
हे पण वाचा: संजय जाधवांच्या विधानावर भाजपाने दिली प्रतिक्रिया, “तुम्ही काहीही करा पण…”
‘केंद्रीय मंत्रिमंडळात भाजपमधील आयारामांना संधी देण्यात आली, मग महाराष्ट्रात भाजपचा विस्तार करण्यात सिंहाचा वाटा असणाऱ्या दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या मुलीचं काय चुकलं होतं,’ असा सवाल करत प्रीतम मुंडे यांच्या समर्थकांकडून सोशल मीडियावर पक्षाविरोधातील नाराजी बोलून दाखवली जात होती. मात्र, त्यांना डावलत नुकतेच राज्यसभेवर वर्णी लागलेले आणि दिल्लीतील राजकारणाचा अनुभव नसलेले डॉ. भागवत कराड मंत्री झाले. पंकजा मुंडे यांना डावलण्यासाठीच त्यांच्याच कार्यकर्त्याला एवढी मोठी जबाबदारी देण्यात आली असल्याची चर्चा होती.
हे पण वाचा: अविनाश भोसलेंना ईडीचा दणका, पुण्यातील तब्ब्ल ४ कोटींच्या संपत्तीवर आणली टाच
कराड यांनी मराठवाड्यात यात्रा काढण्याचे आदेश पक्षाच्या वतीने देण्यात आले आहे. या आधी गोपीनाथ मुंडे आणि पंकजा मुंडे यांनीच अशा प्रकारे ‘संघर्ष’ यात्रा काढलेल्या आहेत. त्यामुळे डॉ. कराड यांची यात्रा, पंकजा यांना शह देण्यासाठीच असल्याची त्यांच्या कार्यकर्त्यांची भावना झाली आहे.
हे पण वाचा: मुख्यमंत्र्यांचे एकच धोरण, सगळं केंद्राने करावं, द्याव; मी घरात बसणार किंवा मर्सिडीज चालवणार
या सर्व पार्श्वभूमीवर कराड यांची यात्रा बीड जिल्ह्यातील ‘भगवान गड’ इथून सुरूवात करण्याचे नियोजन करण्यात आले होते. मात्र, स्वत: पंकजा मुंडे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचाही या यात्रेला विरोध होतोय. त्यामुळे अखेर बीड जिल्हा वगळून डॉ. कराड यांची ‘जनआर्शिवाद’ यात्रा काढण्यात येणार आहे. त्यासाठी केवळ पाच जिल्ह्यांचे नियोजन करण्यात येत आहे. यात नांदेड, हिंगोली, परभणी, जालना आणि औरंगाबाद या जिल्ह्यांचा समावेश आहे.
Read Also :
- पुन्हा एकदा फडणवीसांची खेळी: संजय कुटे होणार भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष?
- महाराष्ट्र पेटवायला दोन मिनिटं सुद्धा लागणार नाही, संभाजीराजे म्हणतात…..
- शिवसेनेच्या ‘या’ मंत्र्याची माणिकराव ठाकरे यांनी केली तक्रार; आघाडीत धुसफूस?
- दिल्लीत भाजप नेत्यांची महत्वपूर्ण बैठक, राज्याच्या राजकारणात मोठी घडामोड होण्याची शक्यता?
- स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महाविकास आघाडी नाही? नवाब मलिकांचं मोठं विधान