नवी दिल्ली : देशाची राजधानी दिल्लीमध्ये मोठी राजकीय खळबळ उडाली आहे. आम आदमी पार्टीच्या नेत्यांनी केलेल्या 15 कोटी रुपयांच्या ऑफर आणि भाजपकडून फोन आल्याच्या दाव्याच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. यासंदर्भात दिल्लीचे नायब राज्यपाल व्ही.के. सक्सेना यांनी आदेश दिल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक ब्युरोच्या टीमने आम आदमी पक्षाचे संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, आमदार संजय सिंह आणि आमदार मुकेश अहलावत यांच्या घरी धाव घेतली.
हेही वाचा…“तोच विनोद पुन्हा-पुन्हा..”, राहुल गांधींच्या दाव्यावर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
मिळालेल्या माहितीनुसार, ACB पथक कोणतीही पूर्वसूचना न देता अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी पोहोचले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, केजरीवाल यांच्या कायदेशीर टीमसोबत बैठक सुरू आहे. तसेच, ACB कार्यालयात आमदार संजय सिंह यांचा जबाब नोंदवला जात आहे. या चौकशीसाठी ACB ने तीन स्वतंत्र टीम तयार केल्या असून, चौकशी प्रक्रियेसाठी आवश्यक ती सर्व कायदेशीर पावले उचलली जात असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
AAPच्या कायदेशीर विभागाचे प्रमुख आणि वरिष्ठ वकील संजीव नसियार यांनी माध्यमांना माहिती देताना सांगितले की, “ACBच्या टीमकडे कोणतीही अधिकृत नोटीस नाही. त्यांनी कोणतीही नोटीस सादर केली नाही. त्यामुळे आमची कायदेशीर टीम संबंधित कलमांखाली तक्रार दाखल करणार आहे. आमच्याकडे आमच्या आरोपांचे पुरावे आहेत.”
हेही वाचा…भाजपने चिटींग करून महाराष्ट्रात निवडणूक जिंकली..! राहुल गांधींनी थेट पुरावाच दिला
दिल्ली भाजपचे सरचिटणीस विष्णू मित्तल यांनी नायब राज्यपालांना पत्र लिहून केजरीवाल आणि संजय सिंह यांच्यासह सात आमदारांना 15 कोटी रुपयांची लाच दिल्याच्या आरोपांची सखोल चौकशी करण्याची मागणी केली होती. तसेच, लाचलुचपत प्रतिबंधक ब्युरो (ACB) किंवा अन्य तपास संस्थेला एफआयआर दाखल करण्याचे निर्देश देण्याची विनंती करण्यात आली होती.
एसीबीच्या सूत्रांनी सांगितले की, “AAPच्या नेत्यांनी केलेले आरोप गंभीर असून त्याचा सखोल तपास करणे आवश्यक आहे. त्यामुळेच अरविंद केजरीवाल यांचे म्हणणे नोंदवण्यासाठी आम्ही त्यांच्या घरी पोहोचलो आहोत. त्यांनी सहकार्य करणे गरजेचे आहे. त्यांच्या निवासस्थानीच चौकशी करण्याचे कारण म्हणजे त्यांना अधिक सोईस्कर वाटावे.” तसेच, या चौकशीच्या आधारे पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.
हेही वाचा…सरकारच्या विरोधात विरोधक एकवटले..! शरद पवारांच्या शिलेदारांचा मोठा निर्णय
हेही वाचा…मोठी बातमी..! लाडक्या बहीण योजनेतून ५ लाख महिलांना अपात्र करण्याचा निर्णय, यादी आली समोर
हेही वाचा…“एक रेड्याचं शिंग नक्की आणणार अन्…” संजय गायकवाड राऊतांवर भडकले
हेही वाचा…“त्यामुळेच राहुल गांधींची आता रडारड सुरू झालीय”, भाजपचा राहुल गांधींवर पलटवार
हेही वाचा…कृषी विभागातील सर्वात मोठा घोटाळा..! धनंजय मुंडेंच्या अडचणी आणखी वाढल्या