पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनला धडा शिकवल्यानंतर आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प चीनला झटका दिला आहे चीनच्या सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाचे सदस्य असलेल्या सगळ्यांनाच अमेरिकेत प्रवेशबंदी करण्याचा निर्णय ट्रम्प घेऊ शकतात. ट्रम्प प्रशासन त्यासाठीच्या निर्णयावर विचार करत आहे. तो निर्णय झाला तर अलीबाब या बलाढ्य कंपनीचे मालक जॅक मा यांनाही अमेरिकेत प्रवेशबंदी होणार आहे.
चीनच्या जवळपास सगळ्याच बड्या कंपन्यांचे मालक हे कम्युनिस्ट पक्षाचे सदस्य आहेत. त्यांची संख्या 8 हजारांच्या आसपास असल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय. हा निर्णय लागू झाला तर त्याचा फटका तब्बल 90 लाखांपेक्षा जास्त चिनी लोकांना बसू शकतो.
कोरोनाच्या उद्रेकानंतर चीन आणि अमेरिकेत आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. अध्यक्ष ट्रम्प हे तर दररोज ट्विटरच्या माध्यमातून चीनवर आरोपांच्या फैरी झाडत आहेत. चीननेच कोरोना व्हायरस जगात पसरवला असा जाहीर आरोप ते वारंवार करत आहेत.
या वादाचा परिणाम व्यापारावर झाला असून चीन आणि अमेरिकेला त्याचा जोरदार फटका बसला आहे. तर त्यामुळे जागतिक अर्थव्यस्थेलाही जोरदार फटका बसणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.