मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि राष्ट्रवादीवर वकिल गुणरत्ने सदावर्ते यांनी निशाणा साधला आहे. शरद पवार यांच्या काळात दाऊद मोठा होऊन निघून गेला. हा कटच होता. असा आरोप वकिल गुणरत्ने सदावर्ते यांनी केला आहे. त्यामुळे आता गुणरत्ने सदावर्ते यांना राष्ट्रवादीकडून काय प्रत्युत्तर देण्यात येणार त्याकडे सगळ्याचं लक्ष्य लागून राहिलं आहे.
भाजपचं ठरलं..! चिंचवड पोटनिवडणुकीसाठी भाजपचा उमेदवार ठरला..?
शरद पवार यांच्या काळात दाऊद मोठा होऊन निघून गेला. हा कटच होता. दिलीप वळसे पाटील, अजित दादा हे पवारांचे प्यादे आहेत. संजय पांडेंना पोलीस आयुक्त म्हणून बसवण्यामागचं कारण हेच होतं. नुसता कट नाही तर हे जेलमध्ये जातील असा प्रयत्न होता. माझ्यावर दबाव होता. मी नावं घ्यावीत अशा अनुषंगाने मोहोळ उभं केलं जायचं, असंही त्यांनी म्हटलं आहे.
“राष्ट्रवादीचा आमदार शिंदे गटाच्या संपर्कात, दावा फेटाळला, शिंदे गट तोंडावर आपटला”
महाविकास आघाडी सरकार असतांना एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन गाजलं होतं. त्यावेळी गुणरत्ने सदावर्ते यांनी एसटी कर्मचाऱ्यांना भडकावलं असल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर त्यांना पोलिसांनी अटकही केली होती.
Read also
- “देवेंद्र फडणवीसांनाच आम्ही सरप्राईज देणार”; जंयत पाटील
- “माझ्यावर गुन्हा दाखल झाला तरी मला त्याची पर्वा नाही”; संतोष बांगरांची त्यानंतर प्रतिक्रिया
- “मोदींचा मुंबई दौरा, फडणवीसांचं वक्तव्य, म्हणजे सरकार पडण्याच्या टप्प्यात ;” सुषमा अंधारे
- पाच ही उमेदवारांना विजयी करा, आघाडीकडून शिक्षक अन् पदवीधर निवडणुकीचे उमेदवार घोषीत
- “मुख्यमंत्र्यांनी संतोष बांगर यांच्यावर तात्काळ मोक्का लावून कारवाई करावी”