मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी घोटाळ्यातून आलेले बेहिशेबी पैसे आपल्या कुटुंबीयांच्या नावे सुरू केलेल्या बनावट कंपन्यांमध्ये वळवले. ठाकरे या चित्रपटाच्या प्रकल्पातही त्यांनी बेहिशेबी पैसे वळवले असा दावा या प्रकरणात इडीच्या महत्त्वाच्या साक्षीदार असलेल्या स्वप्ना पाटकर यांनी आपल्या जबाबात केला आहे. तसेच संजय राऊत यांनी ‘राऊतर्स एंटरटेन्मेंट एलएलपी’ नावाची कंपनी स्थापन केली. त्याद्वारे त्यांनी ठाकरे या चित्रपटाची निर्मिती केली. असं देखील इडीच्या आरोपपत्रात म्हटलं आहे.
संजय राऊतांसोबत आता शरद पवारांची देखील पत्राचाळ प्रकरणी चौकशी करा; भाजप आमदाराची मागणी
त्या प्रकल्पात त्यांनी आपले बेहिशेबी पैसे वळवले. सोबतच एप्रिल-२०२१ मध्ये मद्य व्यवसायाच्या एका कंपनीतही त्यांचे स्वारस्य होते. अलीकडच्या काळात कुटुंबीयांच्या नावे बनावट कंपन्या सुरू करूनही त्यात बेहिशेबी पैसे वळवणे त्यांनी सुरू केले होते’, असादेखील दावा पाटकर यांनी जबाबात केला आहे. अशाप्रकारे संजय राऊत हे जाणूनबुजून गुन्ह्यातील उत्पन्न निर्माण करण्याच्या प्रक्रियेत आणि मालमत्तेचे संपादन करण्यासाठी आणि इतर संस्थांकडे हस्तांतरित करण्याच्या प्रक्रियेत सामील होते, असा ईडीचा आरोप आहे.
गुजरातला उद्योगाचा पेटारा , महाराष्ट्राला बेरोजगारीचा कटोरा ” “गुजरात तुपाशी , महाराष्ट्र उपाशी”
किहीम, अलिबाग येथील जमीन खरेदी करताना संजय राऊत यांनी मोठ्या प्रमाणात रोख रक्कम वापरली, हे तपासात पुढे आलं आहे. याची विक्रेत्यांनीही पुष्टी केली आहे. खासदार म्हणून संजय राऊत यांना महिन्याला 1 लाख 85 हजार आणि सामना वर्तमानपत्रात काम करतात तिथे 1 लाख रुपये पगार मिळतो त्यांच्या पत्नी वर्षा या शिक्षिका असून त्यांना महिन्याला 80 हजार पगार मिळतो. राऊत नोकरीशिवाय कोणताही व्यवसाय करत नाहीत, असं ईडीने त्यांच्या आरोपपत्रात नमूद केलं आहे.
“एसटी महामंडळाला निधी देताना हात आखडते का घेत आहेत?” रोहित पवारांचा सवाल
2006-07 साली संजय राऊत यांनी तत्कालिन केंद्रीय कृषीमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली पत्रा चाळ पुनर्विकासासाठी म्हाडा अधिकारी आणि इतरांसह बैठकांना आणि माजी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील दुसऱ्या बैठकीला हजेरी लावली होती. त्यानंतर राकेश वाधवान यांनी मेसर्स गुरूआशिष कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेडमार्फत पत्रा चाळ पुनर्विकास करण्यासाठी आणले, असा दावाही ईडीने केला आहे. प्रकल्पावर नियंत्रण ठेवण्यासाठी संजय राऊत यांनी प्रविण राऊत यांना त्यांचे प्रॉक्सी आणि विश्वासपात्र म्हणून समाविष्ट केलं. मनी ट्रेलच्या तपासात प्रविण राऊत या संजय राऊत यांच्या प्रॉक्सीने एचडीआयएलकडून त्याच्या बँक खात्यात 112 कोटी रुपये प्राप्त केले. पुढे हे पैसे मालमत्ता संपादन करणे, त्याच्या व्यावसायिक संस्था, कुटुंबातील सदस्यांच्या खात्यात वळवणे इत्यादींमध्ये हस्तांतरित केले.
Read also
- “पत्रावाळ चाळ प्रकरणी शरद पवारांची चौकशी व्हावी”, भाजपची मागणी, शरद पवार म्हणाले, “लवकर करा, नाहीतर..:”
- “तोंडात सोन्याचा चमचा घेऊन आलेल्यांनीच मुख्यमंत्री व्हायचे काय?” शिंदेंचा सवाल
- “तरुणांच्या हाताला रोजगार कधी मिळणार ते सांगा”; अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांना सुनावलं
- “रामदास कदमांनी महाराष्ट्रात फिरून दाखवावं”; सुषमा अंधारेंनी दिला कदमांना इशारा
- “राष्ट्रवादीची तळी उचलून तुमच्या पक्ष प्रमुखांनी संपूर्ण पक्ष भिकेला लावला”