मुंबई : १०० कोटी वसुलीप्रकरणी अडचणीत आलेले राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ झाली असून, सुप्रीम कोर्टात अटक होऊ नये म्हणून, त्यांनी दाखल केलेली याचिका न्यायालयाने फेटाळल्यानंतर तसेच, सीबीआयने दाखल केलेल्या गुन्ह्यातील दोन परिच्छेद वगळण्यात यावेत, ही राज्य सरकारची याचिका हायकोर्टाने फेटाळल्यांनंतर, ईडीने देशमुख पिता-पुत्रांना कथित मनी लाँडरिंग प्रकरणी चौकशीसाठी, पुन्हा नवीन समन्स जारी करत सोमवारी हजर राहण्यास सांगितले होते.
ईडी म्हणतीये, “अनिल देशमुख कुठे, याची आम्हाला माहिती नाही! आम्ही त्यांची वाट पाहतोय”
मात्र, ईडीच्या चौथ्या समन्सनंतर देखील अनिल देशमुख चौकशीला गैरहजर राहिले. त्यामुळे आता अनिल देशमुख नेमके कुठे गायब झाले आहेत? असा सवाल ईडीला पडला आहे. तसेच, यासंदर्भात आता ईडी सर्वोच्च न्यायालयाकडून आज दिल्या जाणाऱ्या आदेशांची वाट बघत असून, “आम्ही अनिल देशमुखांशी संप्रर्क साधण्याचा प्रयत्न करत आहोत, मात्र अनिल देशमुख कुठे आहेत, याची आम्हालाही माहिती नाही. त्यांचा नेमका ठावठिकाणा आम्हाला माहिती नाही”, असं ईडीने म्हटलं आहे.
“नावं बदलायची सोडून भाजप देशात विकासाठी काही करणार का?” काँग्रेसने घेतला आक्रमक पवित्रा
दरम्यान, आज ईडीने पुन्हा एकदा देशमुखांवर कारवाई करत त्यांच्या मालकीच्या असलेल्या, नागपूर जिल्ह्यातील नागपूर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी कॉलेजवर छापा टाकला आहे. याआधीही त्यांच्या काटोल आणि वडविहिरा येथील निवासस्थानी ईडीने छापा टाकला होता. तसेच, १६ जुलैला ईडीने देशमुखांची कोट्यवधी रुपयांची संपत्ती जप्त केली होती. मनी लॉंड्रिंगप्रकरणी ईडीने ही कारवाई केली होती.
मोठी बातमी : राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचं नाव बदललं, आता “या” नावाने पुरस्कार
आज सकाळी ११ वाजता ईडीचे अधिकारी कारवाईसाठी पोहोचले, ही कारवाई दुपारपर्यंत सुरूच होती. यासोबतच, इतरही काही ठिकाणांवर छापे टाकल्याची माहिती एएनआयनं दिली आहे. कारवाईदरम्यान अकाउंट्ससह संगणाकतील इतर माहिती अधिकाऱ्यांनी गोळा केली असून, अनिल देशमुख या संस्थेचे अध्यक्ष, त्यांचा मोठा मुलगा सलिल उपाध्यक्ष, त्यांची पत्नी आरती देशमुख आणि पीए कुंदन शिंदे हे दोघे या संस्थेवर पदाधिकारी असल्याची माहिती मिळत आहे.
Read Also :
- मुंबई लोकलबद्दल पुढच्या दोन दिवसात निर्णय होणार; आदित्य ठाकरेंचे महत्वपुर्ण विधान
- राज्यातील कलाकारांना मोठा दिलासा: प्रत्येकी ५ हजार रुपयांची आर्थिक मदत मिळणार
- “अहमदाबादच्या क्रिकेट स्टेडियमलाही खेळाडूंचेच नाव द्या”, नामकरणाच्या वादावरून काँग्रेसची आक्रमक मागणी
- “सेनेची ताकदच दाखवायची असेल, तर मुंबई महापालिकेची निवडणूक लढवा” पाटलांचे राऊतांना आव्हान
- मोठी बातमी : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या ताफ्यातील ३ गाड्यांचा अपघात