मुंबई : आता एक तर तु राहशील किंवा मी राहीन, असे जाहीर इशारा उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना निवडणुकीपुर्वीच दिला होता. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर ठाकरेंची ही व्हिडीओ क्लिप शेअर करत भाजपने त्यांना खुप डिवचण्याचा प्रयत्न केला. तर यावर आता पहिल्यांदाच नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रत्युत्तर दिले आहे.
हेही वाचा…उपमुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदे राजी, ? पण गृहमंत्रीपदाबाबतचा पेच कायम, काय घडतंय?
महाराष्ट्रात जो राजकीय संवाद आहे, विशेषत दाक्षिणात्य राज्यांमध्ये आणि महाराष्ट्रात हा फरक आहे, महाराष्ट्रात राजकीय संवाद संपलेला नाही. पण अनेक राज्यामध्ये दोन राजकीय पक्ष आणि नेत्यांमध्ये एवढा विसंवाद असतो की जणू खून के प्यासे असं पाहायला मिळतं. महाराष्ट्रात तशी परिस्थिती कधीच नव्हती आणि पुढेही राहू नये यासाठी माझा प्रयत्न असेल. तसेच राजकारणात तेही राहतील आणि मीही राहीन, सगळेच राहतात असे म्हणत त्यांनी ठाकरेंना प्रत्युत्तर दिले.
हेही वाचा…मोठी बातमी…! बावनकुळेंसह, पडळकर, आमश्या पाडवींचं विधान परिषदेचं सदस्यत्व रद्द, कारण काय ?
दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या उत्तरा नंतर संजय राऊत यांनी सावरासारव करण्याचा प्रयत्न केला आहे. निवडणुक काळात बऱ्याचदा नेत्यांकडून अशा प्रकारची टोकाची वक्तव्ये होत असतात. निवडणुकीच्या माध्यमातून जनतेने त्यांचा निर्णय दिला आहे. अर्थात हा निर्णय आम्हाला मान्य नाही. त्या विरोधात आम्ही निवडणूक आयोगाकडे जात आहोत. तसेच आम्ही जनतेच्या न्यायालयात देखील जात आहोत आता भाजपकडे बहुमत आहे. त्यामुळे तेही राहिले आहेत आणि आम्ही देखील विरोधी बाकावर राहिलो आहेत. असे संजय राऊत यांनी सांगितले.
READ ALSO :
हेही वाचा…संसदेत कॉंग्रेस खासदाराच्या खुर्चीखाली सापडलं नोटांचं बंडल, चौकशी सुरू
हेही वाचा…मोठी बातमी..! हंगामी अध्यक्ष म्हणून कालिदास कोळंबकर यांची नियुक्ती
हेही वाचा…“मुख्यमंत्री बदलतो, पण अजित पवार झालेहेत पर्मनंट उपमुख्यमंत्री”, नवा रेकॉर्ड अलर्ड मोडवर..