माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सध्या जळगावच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यावर असतानाही मात्र भाजप नेते एकनाथ खडसे यांच्याशी त्यांची भेट होऊ शकली नाही. एकनाथ खडसे यांचा पाय फ्रॅक्चर असल्याने ते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी जाऊ शकले नाहीत.
असे असले तरी ही या दोन्ही नेत्यांनी मात्र फोनवरून चर्चा केली. देवेंद्र फडणवीस यांच्या ताफ्यातील गाडीला अपघात झाल्याची माहिती कळताच खडसेंनी फोन करत विचारपूस केली.
दोन्ही नेत्यांमध्ये जळगावच्या वरणगाव पोलीस प्रशिक्षण केंद्र, खतांची साठेबाजी अशा विविध मुद्यांवर चर्चा झाली. दरम्यान, फडणवीस सध्या विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आमदार गिरीश महाजन यांच्यासह जळगावच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील कोव्हिड रुग्णालयांची पाहणी केली.