पिंपरी चिंचवड : राज्यासह पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आगामी निवडणुका काही महिन्यांवर येवून ठेपल्या आहेत. त्या अनुशंगाने भाजपने मोर्चेबांधणीला सुरूवात केली आहे. याचपार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड भाजपचे प्रवक्ते यांची जिल्ह्याच्या सरचिटनीस पदाबरोबर पिंपरी, चिंचवड आणि भोसरी विधानसभेच्या समन्वयक पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
विधानपरिषद निवडणुकीत पक्ष तटस्थ, तरीही बसपाचे दोन नगरसेवक मतदानाला! कोणासाठी?
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणुका फेब्रुवारी २०२२ मध्ये होण्याची दाट शक्यता आहे. महापालिकेवर सध्या भाजपची सत्ता आहे. त्यामुळे २०२२मध्येही पिंपरी चिंचवड महापालिकेवर भाजपचा झेंडा अबाधित ठेवण्यासाठी पदाधिकारी दोन्ही पाय धट्ट करून मैदानात उभे राहिले आहेत. दरम्यान, पिंपरी चिंचवड शहरात पिंपरी, चिंचवड आणि भोसरी असे तीन विधानसभा मतदास संघ येतात. काही दिवसांपु्र्वीच भाजप महाराष्ट्र प्रदेशाच्या वतीने सदाशिव खाडे यांची पिंपरी विधानसभेच्या प्रभारी पदी, तसेच संतोष गुलाबराव कलाटे यांची चिंचवड विधानसभेच्या प्रभारी पदी, तर विजय फुगे यांची भोसरी विधानसभेच्या प्रभारी पदी निवड करण्यात आली होती.
पिंपरी चिंचवड महापालिकेत भाजपची सत्ता खेचून आणण्यामध्ये शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे आणि आमदार लक्ष्मण जगताप यांचा मोलाचा वाटा आहे. येत्या महापालिका आणि विधानसभा निवडणुकांसाठी दोन्ही आमदारांसह पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी कंबर कसली आहे. त्याअनुशंगाने प्रवक्ते अमोल थोरात यांची जिल्ह्याच्या सरचिटणीस पदासह पिंपरी, चिंचवड आणि भोसरी या तीनही विधानसभेच्या समन्वयक पदी नियुक्ती करण्यात आली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी थोरात यांच्या नियुक्तीचे पत्र दिले आहे. आगामी काळातील या तीन ही मतदारसंघातील सहकाऱ्यांना सोबत घेवून ही जबाबदारी यशश्वीरित्या पार पाडसाल, अशी अपेक्षा चंद्रकांत पाटलांनी व्यक्त केली आहे.
Read Also :
- राष्ट्रवादीत कलह आणि फायदा काँग्रेसचा; मिळाले उपसभापतिपद
- शिवसेना-राष्ट्रावादीत ठिणगी; शिवसेना सोयीचे वॉर्ड तयार करत असल्याचा दावा
- अनिल परबांकडून ‘त्या’ दहा हजार एस टी कर्मचाऱ्यांसाठी मोठी घोषणा..!
- विधान परिषदेत कोणाची बाजी? अकोला नागपूरमध्ये शिवसेना भाजप आणि काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
- तुम्ही शिवसेनेचं बोट धरुनच मोठे झालात, हे विसरु नका – शंभुराज देसाई