लॉकडाउनच्या काळात सर्वसामन्यांना भलेमोठे वीज बिल आल्याने मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त केला जात आहे. यावर तोडगा काढण्यासाठी आज कॅबिनेटची महत्त्वाची बैठक पार पडली. लवकरच वीजबिल दरवाढ सवलतीचा प्रस्ताव आणला जाणार आहे.
पमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुढाकार घेत वीज नियामक मंडळासोबत बैठक घेतली. या बैठकीला ऊर्जामंत्री नितीन राऊत, अनिल परब उपस्थित होते. ग्राहकांना वीज बिल दरात मोठी सूट दिली जाणार आहे. या संदर्भातील प्रस्ताव एमईआरसीकडे पाठवला जाणार आहे. एमईआरसीने मंजूर झाल्यानंतर राज्य सरकार याला परवानगी मिळेल.
लोकडाऊन काळात ग्राहकांना आलेल्या वाढीव विजबिलांसंदर्भात आज माननीय उपमुख्यमंत्री @AjitPawarSpeaks यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. सामान्य ग्राहकांना दिलासा देणारा प्रस्ताव लवकरच मंत्रिमंडळासमोर आणणार.@NitinRaut_INC pic.twitter.com/pLHPpAopMP
— Anil Parab (@advanilparab) July 29, 2020
परिवहन मंत्री अनिल परब यांनी देखील या संदर्भात माहिती देताना सांगितले की, अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली या संदर्भात बैठक पार पडली असून, सामान्य ग्राहकांना दिलासा देणारा प्रस्ताव लवकरच मंत्रिमंडळासमोर आणला जाईल. तसेच सामान्य ग्राहकांना दिलासा देणारा निर्णय घेतला जाणार आहे.
उर्जा मंत्री नितीन राऊत यांनी माहिती दिली की, वीजबिल संदर्भात सूट देण्याबाबत चर्चा झाली असून, एमईआरसीला वीज बिलात सूट द्यावी अशी विनंती केली आहे. घरगुती वीजबिल सवलत निर्णय पुढच्या कॅबिनेट आणला जाईल. एमईआरसी अधिकारी परदेशात आहे. त्यामुळे पुढील कॅबिनेट प्रस्ताव आणला जाईल.