मुंबई : माझ्यावर कुठलाही गुन्हा नोंदवला असता तरी चालले असते परंतु ३५४ हा गुन्हा मला मान्य नाही. आणि जो मी आयुष्यात केला नाही. पोलिसांनी हा गुन्हा कसा काय दाखल केला. तक्रारीत शब्द वापरले आहेत ते त्यापेक्षा व्हिडीओ क्लीअर आहे कोणते शब्द वापरले आहेत ते. समाजात माझी मान खाली जाईल अशा पद्धतीचा गुन्हा नोंदवायचा हा षडयंत्राचा भाग झाला आहे. त्यामुळे राजकारण करावं मी मंत्री असताना माझ्या वागण्याची पद्धत सगळ्यांना माहित होती. असं राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे.
“जितेंद्र आव्हाडांनी आमदारकीचा राजीनामा दिला..!” जंयत पाटलांची माहिती
जितेंद्र आव्हाडांवर एका महिलेने विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. त्यावर ते बोलत होते. पुढे ते म्हणाले की, सरकार सगळ्यांचे असते. आमदारांमध्ये भेदभाव केला नाही. मला असेच पोलिस ठाण्यात नोटीस देत आहे म्हणून बोलावले. थोड्यावेळाने डीसीपी आले. त्यांच्याशी गप्पा मारल्या आणि मी मुंबईत जातोय म्हटल्यावर तुम्हाला अटक करण्यात येत आहे असे सांगण्यात आले. ४१ अन्वये नोटीस दिल्यानंतर ७२ तास त्या व्यक्तीला द्यावे लागतात. त्या नोटीसमध्ये पाच वाजता चौकशीला हजर रहा सांगत आहेत. इंग्रजाच्या काळातील कलम लावून उपजीविकेच्या साधनात अडचण केली म्हणून मला अटक करण्यात आली.
“आव्हाडांवर विनयभंगाचा गुन्हा लावणे हा अतिशय भ्याड हल्ला”; अन् अजित पवार संतापले
आम्ही लढलो शिवाजी महाराजांसाठी आणि लढत राहू त्यामुळे जेलमध्ये राहणे हे नवीन नाही. जेम्स लेन आला तिथपासून लढत आहे. आणि ही लढाई अविरत चालू राहील. पण पोलिसी बळाचा वापर कशासाठी त्याबद्दल मला जास्त बोलायचे नाही. परंतु माझ्यावर ३५४ गुन्हा दाखल करता. माझ्या खुनाबद्दल प्लॅनिंग झाले असते तर काही वाटलं नसते. परंतु ३५४ चा गुन्हा दाखल करता इतके खालचे राजकारण त्यापेक्षा यात न राहिलेले चांगले. असेही जितेंद्र आव्हाड म्हणाले.
Read also
- “राजकीय परिस्थिती पाहता राज्यात मध्यवर्ती निवडणुका लागणार का ?” अजित पवार म्हणाले, जोपर्यंत..;
- “आम्ही कोणत्याही राजकीय सुडापोटी कारवाई केली नाही”; मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया
- “शरद पवारांनी आव्हाडांना पक्षातून निलंबित करावं”; भाजपच्या बड्या नेत्याची मागणी
- “शाळेत माझ्या मुलीला पण विचारलं की, तुझ्या वडिलांनी..;” अन् जितेंद्र आव्हाडांच्या डोळ्यात पाणी
- “त्यांनी मला हात लावला, तेव्हा जी फिलिंग आली, ती…”; पीडित महिलेचा आव्हांडावर धक्कादायक आरोप