IMPIMP
Even though the RSS got so much trouble from the BJP, the Mitra Mandal was destroyed by the Sharad Pawar group there Even though the RSS got so much trouble from the BJP, the Mitra Mandal was destroyed by the Sharad Pawar group there

“RSSअन् भाजपकडून एवढे हाडतुड केले तरी मित्र मंडळ तिथचं”, शरद पवार गटाने डिवचलं

पुणे : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची संबंधित असलेल्या ऑर्गनायझर मासिकामध्ये केलेल्या टिकेवरून सध्या महायुतीवर विरोधीपक्षांकडून टिकास्त्र सोडलं जात आहे. अशातच रोहित पवारांनी जयंत पाटील यांच्याबाबत भाष्य करतांना मुख्यमंत्री पदासाठी ते सक्षम नेतृत्व असल्याचे सांगितले. त्यावरून अजित पवार गटातील प्रवक्ते सुरज चव्हाण यांनी त्यावर टिका केली. आता शरद पवार गटातील प्रवक्ते रवीकांत वरपे यांनी त्यावर पलटवार केला.

हेही वाचा..राष्ट्रवादीने दावा ठोकल्यानंतर चिंचवडमध्ये अश्विनी जगताप ठाम, म्हणाल्या..

महाविकास आघाडी म्हणून आमच्या पक्षातील बघायचं झाल्यास, आमच्या पक्षात खूप अनुभवी नेते आहेत. आमच्या पक्षात सर्वात जास्त अनुभवी नेता आज कोणता असेल तर जयंत पाटील साहेब आहेत. त्यांनी अध्यक्ष म्हणून पाच ते सात वर्ष पद सांभाळले आहेत. ते नक्कीच सक्षम पद्धतीने काम करू शकतात. असं रोहित पवारांनी म्हटलंय. त्यावर मुख्यमंत्री पदासाठी जयंत पाटिल साहेब यांच्यासारखे अनुभवी नेते आमच्याकडे आहेत. रोहित पवार यांच्या तोंडून हे वाक्य गळ्यावर सुरा ठेऊन जबरदस्ती बोलायला लावल्यासारखं वाटतंय.असा टोला सुरूज चव्हाणांनी लगावला.

हेही वाचा..“अन्यथा विधानसभा निवडणुकीत नाव घेऊन उमेदवार पाडणार”, उपोषण स्थगित पण… 

त्यावर  लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रामध्ये भाजपचे उमेदवार निवडून न येण्याचे कारण अजित दादा आहेत, असे RSS व भाजप कडून सांगितले जात आहे. एवढे हाडतुड केले तरी मित्र मंडळ तिथंच आहे. मित्र मंडळाला अशी काय मजबुरी झाली आहे.  एवढं बोलून पण शांत आहेत. राहिला प्रश्न रोहित दादा यांचा तर त्यांनी त्यांचे मत सांगितले आहे तुम्हाला तर तेवढा पण अधिकार नाही. अशी खोचक टिप्पणी रवीकांत वरपे यांनी केली.

READ ALSO :

हेही वाचा…“मुख्यमंत्री पदासाठी आमच्या पक्षात ‘जयंत पाटील’ सक्षम नेतृत्व”, रोहित पवारांचा मोठं विधान 

हेही वाचा…नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री पदाचा ‘मुरलीधर मोहोळांनी स्विकारला कार्यभार

हेही वाचा..नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री पदाचा ‘मुरलीधर मोहोळांनी स्विकारला कार्यभार

हेही वाचा…“बिल्डर पुत्राला पुन्हा रेड कार्पेट टाकून बाहेर काढण्यासाठी …”पुणे अपघातबाबत धंगेकरांचं मोठं संकेत 

हेही वाचा…अजित पवारांना सोबत घेऊन भाजपचे नुकसान झालं का ? बावनकुळेंनी दिलं ‘हे’ उत्तर