मुंबई : मुंबै बॅंक निवडणुक प्रकरणी राज्याचे विधान परिषद विरोधी पक्षनेते यांच्या राजीनाम्याची मागणीसाठी आपने मुंबईत जोरदार आंदोलन केलं. मुंबईतील त्यांच्या कार्यालयाबाहेर आपने जोरदार आंदोलन करत राजीनाम्याची मागणी केली आहे. तर प्रवीण दरेकरांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. त्यामुळे सध्या मुंबईत राजकीय वातावरण चांगलंच चिघळलं आहे.
काँग्रेस बाप आहे हे फार उशिरा कळले ? महापौर संदीप जोशींचे नानांना शाब्दिक टोले
प्रवीण दरेकर मागील काही दिवसांपासून सतत आरोप केले जात आहेत. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर आपने आंदोलनात उडी घेतल्याने निवडणुकीत चांगलीच रंगत येण्याची शक्यता आहे. यावेळी आपच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी दिली. गली गली मैं शोर है, भाजपवाले चोर है अशा घोषणांनी मुंबई दणादणून गेली. दरेकरांना विरोधी पक्षनेेते पदावरून हाकललं पाहिजे. दरेकरांसोबत संचालक आहे. त्यांनी हजारो कोटी रूपयांचा घोटाळा केला आहे. त्यामुले प्रवीण दरेकरांना जेलमध्ये टाकलं पाहिजे, असं आपचे मुंबईचे नेते धनंजय शिंदे यांनी म्हटलं आहे.
अनिल देशमुखांचा गढ राष्ट्रवादी राखणार; तनपुरे, मिटकरी, मुंडेंसह राष्ट्रवादीची फौज काटोल मतदारसंघात
आंदोलन कर्त्यांनी यावेळी सांगितलं की, पोलिसांनी आमचे कपडे फाडले आहेत. आम्हाला त्यांनी मारहाण करत आमच्यावर दडपशाही करण्याचा आरोप आपच्या कार्यकर्त्यांनी यावेळी केला आहे. तसेच भाजपला जराशी तरी लाज उरली असेल तर मुंबईला लुटणाऱ्या प्रवीण दरेकरांचा राजीनामा घ्यावा, अशी तिखट प्रतिक्रिया देखील यावेळी कार्यकर्त्यांनी दिली आहे. त्याचबरोबर जोपर्यंत प्रवीण दरेकरांचा जोपर्यंत राजीनामा घेत नाही. तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही. पंतप्रधान मोदी म्हणतात की, ना खाऊंगा, ना खाने दुंगा, मग प्रवीण दरेकरांचा राजीनामा का घेत नाही? असा सवाल देखील कार्यकर्त्यांनी यावेळी दिला आहे.
फडणवीसांना भावी मुख्यमंत्री म्हणत, भाजप आमदारांचा एकनाथ शिंदेंवर गंभीर आरोप
दरम्यान, प्रवीण देरकर यांनी त्यांच्यावरील आरोप फेटाळून लावत न्यायालयात दावा ठोकण्याचा इशारा दिला आहे. बॅंकचा नफा पंधरा कोटी असताना दोन हजार कोटींचा घोटाळा शक्य नसल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे आपचे शिंदे, काॅंग्रेस भाई जगताप आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार आहे. राज्य सरकार अनेक विषयात अपयशी ठरलं आहे. त्यामुळे हे सर्व सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं.
Read also:
- गली गली मैं शोर है,प्रवीण दरेकर चोर है! दरेकरांच्या राजीनाम्यासाठी आपचा मुंबईत एल्गार
- राजकीय वातावरण तापलं; शरद पवारांवर झालेली टीका अन् राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून प्रत्यत्तर
- ” वरुण गांधींशी राजकीय भेट नव्हती, मात्र चर्चा झाली”; संजय राऊतांच्या दाव्याने खळबळ
- तुम्ही शिवसेना नाही, सावंतसेना वाढवण्याचा प्रयत्न करू नका; तानाजी सावंतला अंधळकरांनी धो धो धुतलं
- आघाडीत शिवसेना पाठोपाठ काॅंग्रेसही नाराज; काॅंग्रेसचे 25 आमदार सोनिया गांधींची घेणार भेट