वैजापूर : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या संकल्पनेअंतर्गत महाराष्ट्राला केलेल्या अवाहनाला प्रतिसाद देत वैजापूर आणि गंगापूर मतदारसंघातील सर्व नागरिकांनी एकमेकांची काळजी घ्यावी असं अवाहन वैजापूर गंगापूर मतदारसंघाचे आमदार प्रा.रमेश बोरनारे यांनी केले आहे. यासंदर्भात त्यांनी समाजमाध्यमांवरुन लोकांना अवाहन केलं आहे.
आमदार बोरनारे म्हणाले, वैजापूर गंगापूर विधानसभा मतदारसंघातील सर्व नागरिकांना हात जोडून नम्रपणे विनंती करतो की महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये “माझे कुटुंब माझी जबाबदारी” हे अभियान सुरू केले असून आपण आपल्या गावामध्ये वार्डा वार्डा मध्ये नागरिकांना जागरूक करण्यासाठी मास्कचा वापर करावा, सॅनिटायझरने हात स्वच्छ करावे, वेळोवेळी हात साबणाने स्वच्छ धुवून काढावे, सुरक्षित अंतर ठेवावे, अशी अनेक प्रकारची काळजी आपल्या कुटुंबाची घ्यावी याकरिता “माझे कुटुंब.. माझी जबाबदारी” ही मोहीम चालू असून आपण सर्वांनी कोरोना सारख्या संकटावर मात करण्यासाठी सहकार्य करावे ही नम्र विनंती.
दरम्यान महाराष्ट्रात कोरोनाच्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असून दररोज हजारोंच्या संख्येने रुग्णवाढ होत आहे. त्यादृष्टीने महाराष्ट्र शासनाने रुग्णालयात उपचारासाठी वेगवेगळ्या सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत आणि त्याचसंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या संकल्पनेअंतर्गत महाराष्ट्राच्या जनतेला काळजी घेण्याचं अवाहन केलं आहे.
Read Also :
रामाचं नाव घ्यायचं कृती नथुरामाची करायची ! राष्ट्रवादीचा भाजपवर हल्लाबोलhttps://t.co/25KtPtuMZo#RahulGandhi #SupriyaSule #sharadpawar #NCP #BJP
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) October 1, 2020