मुंबई : भारतातला क्रमांक दोनचा दूध उत्पादन संघ असलेल्या, गोकुळ दूधसंघाच्या निवडणुकीच्या २१ जागांसाठी ४५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे होते. यापैकी सत्ताधारी आमदार पी.एन. पाटील, माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या राजर्षी शाहू आघाडीला, पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, खासदार संजय मंडलिक यांच्या राजर्षी शाहू परिवर्तन आघाडीचे सुरुवातीपासूनच तगडे आव्हान होते.
दरम्यान, गोकुळ दूधसंघातील तब्बल तीन दशाकांच्या महादवेराव महाडिक गटाच्या सत्तेला, सतेज पाटील गटाने नियोजित पद्धतीने सुरुंग लावला आणि म्हणूनच गोकुळच्या २१ जागांपैकी तब्बल १७ जागांवर सतेज पाटील गटाचे उमेदवार निवडून आले, तर महाडिक गटाला केवळ ४ जागांवर विजय मिळवता आला. यामध्ये विश्वास पाटील यांचा मोठा हात होता.
त्यामुळेच, आज निवडणूक निर्णय अधिकारी वैभव नावडकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या, गोकुळ दूध संघाच्या संचालक मंडळाच्या बैठकीत, गोकुळच्या अध्यक्षपदी विश्वास पाटील यांची निवड करण्यात आली असून, त्यांच्याकडे असलेल्या अनुभवाच्या शिदोरीमुळे त्यांच्या गळ्यात ही माळ घालण्यात आली आहे.
Read Also :
- कोरोना एक जीव आहे, त्याला जगू द्या; अकलेचे तारे तोडणारे भाजपचे नेते कोण?
- मुख्यमंत्री उच्च न्यायालयात दाखल, कारण गुलदस्त्यात
- लशीचे डोस राज्यांना पुरवण्यास केंद्रसरकार अपयशी; खासदार असदुद्दीन ओवेसी यांची टीका
- एक प्रेम कथा लवकरच! करुणा धनंजय मुंडेंची फेसबुक पोस्ट व्हायरल
- ‘पंतप्रधानांनी पाकिस्तानात बिर्याणी खाल्ली, तेव्हा धर्म भ्रष्ट झाला का?’