मुंबई : राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काल विधानसभेत महाविकास आघाडी सरकारवर धक्कादायक आरोप लावले आहेत. विधानसभा उपाध्यक्षांकडे देवेंद्र फडणवीसांनी एक पेन ड्राईव्ह दिला आहे. त्यामुळे राज्यात एकच खळबळ उडाली आहे. यामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या देखील नावाचा उल्लेख केला आहे. याच पार्श्वभूमीवर आता शरद पवार यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
महाराष्ट्र पॅटर्नचे जे प्रमुख होते, तेच निवडणूक काळात गोव्यात; फोन टँपिंगवरून संजय राऊतांचा टोला
गिरीश महाजन यांना मोक्कामध्ये अडकवण्यासाठी सरकारी वकिल प्रवीण चव्हाण षड़यंत्र रचत होते. यांसदर्भातील देवेंद्र फडणवीस यांनी उपाध्यक्षांकडे दिलेल्या ऑडिओ क्लिपमध्ये मोठे साहेब म्हणून उल्लेख केला आहे. ते मोठे साहेब कोण ? यावर शरद पवार म्हणाले की, या व्हिडीओमध्ये माझा उल्लेख मोठे साहेब म्हणून केला आहे. परंतु याचा आणि माझा काहीही संबंध नसल्याचे शरद पवारांनी म्हटलं आहे. तसेच या शक्तीशाली 125 तासांचं रेकॉर्डींग होऊच शकत नाही. ही यंत्रणा फक्त केंद्र सरकारकडेच आहे, असंही शरद पवारांनी सांगितलं आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेली माहिती सत्य आहे की असत्य आहे. याची अगोदर तपासणी केली पाहिजे. याची राज्य सरकार चौकशी करेल. तसेच फडणवीस यांनी माझ्या नाव पण यात घेतलं आहे. मोठे साहेब म्हणून माझा उल्लेख असल्याचं मी ऐकलं आहे. माझं कधी या संबंधात कुणाशी बोलणं व्हायचं कारण नाही. असंही शरद पवारांनी म्हटलं आहे.
मुख्यमंत्र्यांनी माझी कितीही चौकशी करावी! किरीट सोमय्यांचा ठाकरे सरकारला आवाहन
पेनड्राव्हई मी अध्यक्षांना सुपुर्द करत आहे. सरकार कशा प्रकाराचे कटकारस्थान शिजवत आहेत ते मी या पेनड्राईव्हमध्ये दिले आहे. गिरीश महाजनांच्या संदर्भात पुण्यामध्ये गुन्हा नोंद करण्यात आला होता. 2018 मध्ये मराठा शिक्षण प्रसारक मंडळाच्या भोईटे गटाच्यावतीने गिरीश महाजनांचे स्वीय सहाय्यक रामेश्वर यांनी पाटील गटाच्या व्यक्तीचे अपहरण केले. त्यानंतर महाजनांचा फोन आला आणि त्यांनी धमकी देण्यात आली. अशा प्रकारे खोटी केस दाखल करून गिरीश महाजन यांना अडकवण्यात आला, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.
Read also:
- अधिवेशनात फडणवीसांचा राजकीय बॉम्ब; सरकारी वकिल प्रवीण चव्हाण यांची पहिली प्रतिक्रिया
- ठाकरे सरकारकडून गिरीश महाजनांसोबत इतर नेत्यांना अडकवण्याचा प्रयत्न ! फडणवीसांचा सरकारवर हल्लाबोल
- मग नारायण राणेंचा राजीनामा का घेतला नाही, नवाब मलिकांवरील कारवाई अयोग्य- शरद पवार
- फोन टँपिंग प्रकरणावर उपमुख्यमंत्र्याचं संजय राऊतांना प्रत्युत्तर, म्हणाले…
- गोव्याच्या रश्मी शुक्ला कोण? संजय राऊतांनी केंद्रीय यंत्रणांचे काढले वाभाडे