व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणाऱ्या मराठा समाजातील विद्यार्थ्यांना नोंदणी करताना जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करण्यासाठी 6 महिन्याची वाढीव मुदत दिली जाणार असल्याची माहिती मागास बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे.
व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणाऱ्या सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गाच्या (SEBC) विद्यार्थ्यांना हा मोठा दिलासा मिळणार आहे. वैद्यकीय आणि अभियांत्रिकी शाखेच्या विद्यार्थ्यांना प्रवेश घेताना नोंदणी करतेवेळी जात पडताळणी प्रमाणपत्र जमा करणे गरजेचे आहे. प्रवेशासाठी नोंदणी केल्यानंतर दिलेल्या मुदतीत जातपडताळणी प्रमाणपत्र सादर करायचे होते. मात्र लॉकडाऊन काळात जात पडताळणी प्रमाणपत्र मिळविणे विद्यार्थ्याना गैरसोयीचे होत असल्याने मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांसमोर प्रवेशाचा मोठा पेच निर्माण झालेला आहे.
व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणाऱ्या मराठा समाजातील विद्यार्थ्यांना नोंदणी करताना जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करण्यास ६ महिन्यांची वाढीव मुदत. याचा सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गाच्या #SEBC विद्यार्थ्यांना मोठा दिलासा-इतर मागास बहुजन कल्याण मंत्री @VijayWadettiwar pic.twitter.com/KuRTQhxAEl
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) July 15, 2020
जात पडताळणी प्रमाणपत्राअभावी मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांचे कोणत्याही परिस्थितीत नुकसान होता कामा नये यासाठी तातडीने प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश वडेट्टीवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.
कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीत सर्वच घटकांतील विद्यार्थ्यांना यामध्ये सूट देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय शासनाने घेतला आहे.