इंदापुर : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी महाराष्ट्राचा फक्त एकच दौरा केला तरी ते राज्यात सत्ता आणू शकता. असं वक्तव्य राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी इंदापुरच्या सभेत केलं होतं. त्यानंतर आता भाजपचे नेते गोपीचंद पडळकर यांनी सुप्रिया सुळे यांना या वक्तव्यावरून खोचक टोला लगावला आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीमध्ये टिका टिप्पणी सुरू होईल.
“हे हिंदुत्वाचे सरकार आहे, इथे भक्तांचाच आवाज ऐकला जाईल;” तुषार भोसले
सुप्रियाताईंनी खरंतर राज्यातल्या लोकांना एक गोष्ट सांगायला हवी. त्यांच्यामागून देशात अनेक लोक आले. ममता बॅनर्जी स्वत: च्या भरंवशावर 3 ते 4 वेळा मुख्यमंत्री झाल्या. मायावती 4 वेळा मुख्यमंत्री झाल्या. समाजवादी पक्षालाही मुख्यमंत्रीपद मिळालं. जगनमोहनसारखा तरूण मुलगा, ज्याच्या वडिलांचा पक्ष गेला, चिन्ह गेलं अशा नवख्या मुलानं एकहाती सत्ता आणली. अरविंद केजरीवाल यांनीही एकहाती सत्ता आणली. सुप्रिया सुळेंना हे विचारायला हवं की तुमच्या वडिलांच्या नेतृत्वाखाली गेली 40 ते 50 वर्ष महाराष्ट्राच्या राजकारणात काम करत आहात, पण राष्ट्रवादी काॅंग्रेसला तीन अंकी आमदार कधी निवडून आणता आले नाहीत. असा खोचक टोला पडळकरांनी सुळेंना लगावला.
“एकनाथ शिंदेंच्या सभा म्हणजे बाळसाहेबांच्या सभा आहेत की काय असा भास होतो”; उदय सामंत
पुढे बोलताना ते म्हणाले की, राष्ट्रवादी काॅंग्रेसला स्वबळावर, विश्वासघात न करता, पाठीत खंजीर न खुपसता एकदाही राज्यात मुख्यमंत्रीपद मिळवता आलेलं नाही. त्यांनी दौरे करत बसावं राज्यातल्या लोकांनी राष्ट्रवादी काॅंग्रेसला पुरतं ओळखलं आहे. तुमचे कितीही दौरे झाले, तरी आता काही फरक पडणार नाही, राष्ट्रवादी नको, असं म्हणणाऱ्या युवकांची फळी महाराष्ट्रात तयार झाली आहे. यांच्या भ्रष्टाचाराला, जातीयवादीपणाला आणि यांच्या विश्वासघातकीपणाला राज्यातल्या लोकांनी कायम नकार दिला आहे. पुढेही देतील असंही त्यांनी म्हटलं आहे.
वसंत मोरेंचा दिलदारपणा..! स्मशानात मयत घेऊन जाताना आजोबा खडकावर पडले अन्…;
दरम्यान, निवडणुकीमध्ये फडझड होत असते हे आमच्यापेक्षा कुणीही जास्त जवळून पाहिलेलं नाही. कारण शरद पवार यांचं राजकारण आणि समाजकारण जर पाहिले तर 55 वर्षाच्या काळात जेवढे चढ आलेत तेवढेच उतार आहेत. 55 वर्षात 27 वर्ष सत्तेमध्ये आणि 27 वर्ष विरोधात गेली आहेत. मी त्यांना नेहमीच सांगते की, महाराष्ट्राने तुम्हाला प्रंचड प्रेम दिलंच पण विरोधात असताना महाराष्ट्राने तुम्हाला सर्वात जास्त प्रेम दिलं आहे. असं सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या.
Read also
- “निष्ठेचा सागर उसळणार, भगवा अटकेपार फडकणार..;” दसरा मेळाव्याचा शिवसेनेचा टीझर रिलीज
- सरनाईकांचा मतदार संघ भाजपला हवा..! शिंदे प्रताप सरनाईक यांच्यात कडाक्याचे भांडण
- राष्ट्रवादीचा बारामतीतील ओबीसींचा “हा” आक्रमक चेहरा भाजपने फोडला
- गणेशोत्सव अन् नवरात्र उत्सवांप्रमाणे ‘स्वच्छता’ हा देखील एक उत्सव व्हावा ; चंद्रकात पाटील
- “एक नेता, एक पक्ष, एक विचार, एक लव्य, एक नाथ”; शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याचा टीझर रिलीज