मुंबई – काही दिवसांपूर्वी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली होती. महाविकास आघाडी विरुद्ध भाजपच्या संघर्षामध्ये देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्या भेटीमुळे मोठ्या राजकीय चर्चांना उधाण आले होते. याशिवाय भाजप-मनसे युतीच्या चर्चाही रंगल्या होत्या. याबाबत आज नाशिकमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना राज ठाकरे यांनी सूचक विधान केले. देवेंद्र फडणवीस आणि माझ्यात सविस्तर चर्चा झाली, अशी माहिती त्यांनी दिली.
येथे छत्रपती शिवरायांचे चरण ठेवले होते; दिव्य काशी, भव्य काशीत मोदींकडून महाराजांचं स्मरण
आज नाशिक येथे झालेल्या पत्रकार परिषदेत राज ठाकरे यांना भाजप-मनसे युतीबाबत प्रश्न विचारण्यात आला. यावर राज ठाकरे यांनी प्रथम उडवाउडवीची उत्तरे दिली. या युतीच्या चर्चा तुम्हीच घडवून आणता. तुमचा सोर्स काय हे समजत नाही. युतीच्या चर्चा सुरू असतील. पण त्याबाबत मला काहीच माहीत नाही. असे म्हणतानाच देवेंद्र फडणवीस आणि माझ्यात सविस्तर चर्चा झाली. त्या चर्चेची माहिती मी योग्य वेळी तुम्हाला देईन, असे असे सूचक विधानही त्यांनी केले.
दरम्यान, राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस महाविकास आघाडीचे सरकार आहे पण, त्यांचे आपसातले संबंध फार सुरळीत नाहीत. पत्रपरिषदेत मनसेचे राज ठाकरे यांना प्रश्न विचारण्यात आला, महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेना-राष्ट्रवादी आघाडी होणार का? यावर शिवसेना-राष्ट्रवादी यांच्यातील बेभरवशाच्या संबंधांवर टोमणा मारताना राज ठाकरे म्हणालेत ‘ह्यांच्या घरी पोर होईल का याचे उत्तर मी काय देणार?’
लोकशाहीत अमृत पिऊन कुणीही सत्तेत बसत नाही हे फडणवीसांना कळायला हवं – नवाब मलिक
महापालिका निवडणुकीत शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र येतील काय? ते मला काय माहीत, तो प्रश्न त्यांना विचारा, त्याचे उत्तर मी कसे देऊ शकतो. राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ साहित्य संमेलनासाठी नाशिकमध्ये आले होते त्यावेळी त्यांना हा प्रश्न का विचारला नाही. त्यांच्या पक्षाच्या प्रश्नाचे उत्तर मी कसे देऊ? ह्यांच्या घरी पोर होईल का याचे उत्तर मी काय देणार?” हे राज ठाकरे यांचे उत्तर एकून सर्व हसायला लागलेत.
Read Also :
- ‘ह्यांच्या घरी पोर होईल का याचे उत्तर मी काय देणार?’, राज ठाकरेंचा शिवसेना-राष्ट्रवादीला टोला
- रोहित पवारांचा राम शिंदेंना झटका! कर्जतमध्ये एक जागी राष्ट्रवादी बिनविरोध
- ममतांचा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादीचा ‘तो’ आमदार फोडला..
- मनसेच्या होर्डिंगवर ‘जय श्रीराम’, औरंगाबादमध्ये जोरदार बॅनरबाजी!
- नाशिकमध्ये राज ठाकरेंचा शिवसेनेसह इतर पक्षांना मोठा दणका..