मुंबई : राज्यसभेच्या निवडणुकीला अवघे आठ दिवस शिल्लक राहिल्याने विजयासाठी शिवसेनेसह भाजपने जोरदार मोर्चेबांधणीला सुरूवात केली आहे. आपला उमेदवार निवडून आणण्यासाठी दोन्ही पक्ष आता अपक्ष आमदारांनाला गळाला लावण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यासाठी जोरबैठका आणि फोनाफोनीही सुरू झाली आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस शनिवार ४ जून रोजी सोलापूरच्या दौऱ्यावर जाणार आहेत. त्यामुळे फडणवीस यांच्या दौऱ्याला राजकीयदृष्ट्या अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे.
या दौऱ्यात फडणवीस सोलापुरातील दोन अपक्ष आमदारांना भेटणार असल्याची चर्चा सध्या सुरू आहे. त्यापैकी एक आमदार भाजप पुरस्कृत आहे. तर दुसरा आमदारा हा राष्ट्रवादीच्या जवळचा आहे. या आमदाराला आपल्याकडे वळवण्यासाठी स्वत: फडणवीस मैदानात उतरले आहेत. त्यामुळे अपक्ष आमदार कुणाच्या गळाला लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
“फडणवीससाहेब तुमच्या दोन्ही चेल्याचपाट्याना आवरा; एकाला तुकडा मिळलाय दुसरा वणवण फिरतोय”
सोलापूर जिल्ह्यातील दोन अपक्ष आमदारांमुळे फडणवीसांच्या दौऱ्याला विशेष महत्त्व आले आहे. बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत आणि करमाळ्याचे आमदार संजय शिंदे हे दोघेही अपक्ष आमदार आहेत. यापैकी राजेंद्र राऊत हे भाजप पुरस्कृत असल्याचे त्यांनी यापूर्वीच जाहीर केले आहे. तर करमाळ्याचे आमदार संजय शिंदे हे राष्ट्रवादीशी जवळीक असलेले आमदार आहेत.
राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांसोबतच देवेंद्र फडणवीसांशीही त्यांची जिव्हाळ्याचे संबंध असल्याने त्यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यातच मोठे बंधू आणि राष्ट्रवादीचे माढ्याचे आमदार बबनदादा शिंदे यांना पाठवण्यात आलेल्या ईडी नोटीसीमुळे आमदार संजय शिंदे काय भूमिका घेतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Read also:
- राज्यसभा निवडणुक; नवाब मलिक, अनिल देशमुखांसाठी अजित पवार न्यायालयात जाणार ?
- “संभाजीनगरच्या”टोमणे सभेत”ढोंगी हिंदुत्ववादी उत्तर देणार का?” सभेआधी मुख्यमंत्र्यांना मनसेने डिवचलं
- “मोदींच्या नेतृत्वाखाली एक छोटासा सैनिक म्हणून काम करणार”; हार्दिक पटेल
- भाजपने आयोजित केलेल्या स्पर्धेत ‘राष्ट्रवादीचा जलवा’ ; आमदार सुनील शेळकेंनी जिंकली 12 लाखांची बोलेरो
- “विलास लांडे यांनी कावेबाज लोकांना ओळखावे अन् पुन्हा फिनिक्स भरारी घ्यावी”