नागपुर : यंदा परिवर्तनाचा नारा देत कॉंग्रेसचे गुढधे पाटील पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. याठिकाणी त्यांचा सामाना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत होणार आहे. देवेंद्र फडणवीस चौथ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात असून भाजप विरूद्ध कॉंग्रेस अशा लढतीत भाजपचे संघटनात्मक पाठबळ ही या पक्षाची भक्कम बाजू असून पक्षांर्गत मतभेद हे कॉंग्रेसचे दुखणे आहे. त्यामुळे येथील लढत बघण्यासारखी होणार आहे.
हेही वाचा…“बळीराजाला वाचवण्यासाठी राज्यात आघाडीचं सरकार यावं”, शरद पवारांचा विश्वास
नागपुर दक्षिण-पश्चिम मतदारसंघात याआधी देवेंद्र फडणवीस आणि गुडधे पाटील यांच्यात २०१४ साली लढत झाली होती. त्यात देवेंद्र फडणवीस यांनी बाजी मारली होती. त्यानंतर पुन्हा हे दोन्ही नेते आमनेसामने आले आहेत. एक अभ्यासू नगरसेवक आणमि पक्षनिष्ठ कार्यकर्ता अशी ओळख गुडधे पाटील यांची राहिलेली आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून नितीन गडकरी यांना १ लाख १३ हजार ५०१ मते मिळाली र कॉंग्रेसचे उमेदवार विकास ठाकरे यांना ७९ हजार मते पडलीत.
हेही वाचा…चंद्रकांतदादांच्या पुढाकारामुळे मुस्लिमांची अतिक्रमणे हटली !
ओबीसी वर्ग हा भाजपचा पारंपारिक मतदार मानला जातो. ओबीसीबहुल म्हणूनच नागपुर दक्षिण-पश्चिम मतदारसंघाची ओळख राहिली आहे. यासह दलित मतदारांचीही संख्या मोठी आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभेत हा मतदार भाजपकडून दुरावा गेल्याचे दिसून आले. त्यामुळेत देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी समाजासाठी अनेक कल्याणकारी योजना राबिवण्याचे निर्णय घेतले. प्रफुल्ल गुडधे यांचाही ओबीसी हाच आधार आहे.
२००९ मध्ये देवेंद्र फडणवीस यांनी कॉंग्रेसचे विकास ठाकरे यांचा २७ हजार मतांनी, २०१४ साली कॉंग्रेसचे प्रफुल गुडधे पाटील यांचा ५८ हजार मतांनी व २०१९ साली कॉंग्रेसचे आशिष देशमुख यांचा ४९ हजार मतांनी पराभव केला होता. हा मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. अगदी सुरूवातीपासूनच्या काळापासून फडणवीस यांचा मतदारांशी संपर्क आहे. तेच धोरण त्यांनी २०१४ आणि २०१९ साली मुख्यमंत्री असतानाही कायम ठेवले.
READ ALSO :
हेही वाचा…माजी आमदाराला लोकं कंटाळलीत, पुरंदरमध्ये संभाजी झेंडे प्रचारात सक्रीय
हेही वाचा…पतीसाठी पत्नी पुतण्याच्या विरोधात प्रचाराला मैदानात उतरली.. कोण मारणार बाजी?
हेही वाचा…बंडखोर उमेदवारांवर कॉंग्रेसकडून कारवाईचा बडगा, पुण्यातील दोन नेत्यांवर केली कारवाई
हेही वाचा…प्रशांत जगताप अन् चेतन तुपेंच्या लढाईत ‘मनसे’ कुणाला धक्का देणार ? हडपसरमध्ये तिरंगी लढत
हेही वाचा…उद्धव ठाकरेंचा जाहीरनामा प्रसिद्ध..! काय काय केल्या घोषणा ?