मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुणे दौऱ्यावर आले. अशातच उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर फडणवीसांच्या पहिल्याच दौऱ्यात भाजपने राष्ट्रवादीला खिंडार पाडलं आहे. पुण्यातील राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या प्रभाग क्रमांक 1 च्या माजी नगरसेविका रेखा चंद्रकांत टिंगरे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे हा राष्ट्रवादीला आगामी निवडणुकांमध्ये एकप्रकारे धक्काच मानला जात आहे.
“भाजपमध्ये जाताच बाकीच्या नेत्यांना गंगेमध्ये धुऊन पवित्र केलं”
देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष आणि कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील, यांच्या उपस्थितीत काल रेखा चंद्रकांत टिंगरे यांनी भाजपमध्ये काल पुण्यात प्रवेश केला. यावेळी भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे, पुणे शहाराचे भाजचे अध्यक्ष जगदीश मुळीक, खासदार गिरीश बापट, यांच्यासहसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. भाजपची सत्ता कायम राखण्याची भाजपकडून आता फोडाफोडीचं राजकारण सुरू आहे असा आरोप आता केला जात आहे.
“ज्यांना मंत्रिमंडळात स्थान नाही, त्यांना “अच्छे दिवस” आले असल्याचं समजावं”
अलिकडेच जगदिश मुळीक यांनी असा दावा केला होता की, आगामी निवडणुकांमध्ये भाजपचे पुण्यात 100 पेक्षा अधिक नगरसेवक निवडणून येतील. तसेच पुढे महाविकास आघाडीतील 17 ते 18 नगरसेवक देखील भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं वक्तव्य देखील त्यांनी केलं होतं. मात्र राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी काही वालग्ना होत्या त्याच्या हे उत्तर आहे. असं बोलून अप्रत्यक्षपणे राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांना टोला लगावला होता.
शिंदे सरकारच्या मंत्र्यांचा शपथविधी, अन् राष्ट्रवादीचा नव्या मंत्र्यांबाबत ‘पोस्टर वार’
दरम्यान, पुण्यातील तसेच पिंपरी चिंचवड येथील महापालिकेच्या निवडणुकीची जबाबदारी आता राष्ट्रवादीकडून अजित पवारांकडे देण्यात आली आहे. त्यामुळे अजित पवारांचं आता पुण्यात कार्यकर्त्यांशी संवाद, कार्यक्रम आता दिवसेंदिवस होत आहेत. अलिकडेच अजित पवारांनी कार्यकर्त्यांना संभाळून ठेवण्याच्या सुचना दिल्या होत्या. अशातच आता रेखा चंद्रकांत टिंगरे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने राष्ट्रवादी आगामी काही काळात सावध पावलं उचलण्याची शक्यता आहे.
Read also
- “राज्यात शिवसेनेला संपवण्याचा प्रयत्न फडणवीसांनी केला”; त्यामुळेच बिहारमध्ये राजकारण बदललं
- “ED ची अतिरिक्त तुकडी तातडीने महाराष्ट्रातून बिहारला रवाना”
- “शिंदेंसोबत ४०-५० आमदार गेले, त्या सर्वांनाच मंत्री व्हायचे, पण…;”
- शिंदे-फडणवीस सरकारमध्ये 15 महिला आमदार; पुढच्या टप्प्यात कुणाला मिळणार संधी?
- पाटलांची मंत्रीपदासाठी वर्णी लागल्याने, बावनकुळेंकडे मोठी जबाबदारी, शेलारांकडे मुंबई भाजपचे अध्यक्षपद?