उस्मानाबाद : मराठवाड्यात अतिवृष्टी आणि वादळी वाऱ्यासह जोरदार पावसामुळे नदी-नाल्यांना महापूर आल्याने शेतकऱ्यांचं अतोनात आर्थिक नुकसान झालं आहे. मराठवाड्यातील नुकसानग्रस्त भागातील शेतकरी बांधवांचं उभं पीक वाहून गेल्याचं आणि शेतात गुडघ्यापर्यंत पाणी साचून जमिनीवर मोठमोठे खड्डे पडल्याचे निदर्शनास येत आहे. याच पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी तात्काळ मदतीची घोषणा करावी, अशी मागणी भाजप आमदार राणा जगजितसिंह यांनी केली आहे.
एका हातात नातू, दुसऱ्या हातात नुकसानीची मोळी अन् डोळ्यात अश्रु; जयंत पाटलांसमोर शेतकरी ढसाढसा रडला
शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने त्यांना आधाराची गरज आहे. अशा परिस्थितीत राज्य सरकारने तात्काळ मदतीची घोषणा करणे अपेक्षा आहे. अशावेळी फक्त गोड गोड बोलून आणि धीर सोडू नका, असं सांगून भागणार नाही. तर त्यांना थेट मदत मिळाली पाहिजे, अशी भूमिका घ्याययला हवी. शेतीमालाचे 100 टक्के नुकसान झालंय. मुख्यमंत्र्यांनी ही सगळी परिस्थिती गांभीर्याने घेऊन तात्काळ मदतीची घोषणा करायला हवी, अशी मागणी राणा जगजितसिंह यांनी केलीय.
रस्त्याच्याकडेला उभं राहून पूरपरिस्थितीची पाहणी करू नका, बांधावर उतरा – पंकजा मुंडेचा टोला
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फक्त पर्यटनाला येवू नये. आधी मदत जाहीर करावी त्यानंतर दौरा करावा, असा थेट निशाणा राणा पाटील यांनी मुख्यमंत्र्यांवर साधला. तसंच मदत जाहीर करुन जर दौरा केला तर त्यावेळी आम्ही त्यांचं स्वागत करु, अशी भूमिकाही त्यांनी मांडली. शेतकऱ्यांना सरसकट मदत करण्याची गरज आहे. शेतमालाचे 100 टक्के नुकसान झाले आहे. सरकारकडे सर्व शेतकऱ्यांची यादी आहे, खाते क्रमांक आहे. त्यामुळे पंचनाम्यात वेळ काढू नये. कारण मागील वेळी पंचनामे केलेली रक्कम अजूनही शेतकऱ्यांना मिळाली नाही. कागदी घोडे नाचविण्यात काहीही अर्थ नाही, अशी टीकाही त्यांनी केली.
Read Also :
- शेतातील पिके पाण्याखाली, शेतकरी वाऱ्यावर, पालकमंत्री मात्र पुणे दौऱ्यावर – पंकजा मुंडे
- न्यायालयातही वारंवार खोटं बोलणाऱ्या या भ्रष्टाचाऱ्यांना जनताच धडा शिकवेल – अमित ठाकरे
- भाजपामध्ये गेलेल्या लोकांना केंद्रीय यंत्रणांचे संरक्षण? आम्ही यादी देतो, कारवाई करणार का?
- आमचा दसरा कडवट झाला तर तुमची दिवाळी गोड होऊ देणार नाही; राजू शेट्टींचा इशारा
- पुरात आतापर्यंत तब्बल 436 जणांचा मृत्यू; 22 लाख हेक्टर जमीन उद्ध्वस्त, मुख्यमंत्री पाहणी करणार