नाशिक: नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आजच्या सर्वसाधारण सभेत मोठा गोंधळ उडाला. संतप्त शेतकऱ्यांनी कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांना घेराव घालण्याचा प्रयत्न करत तत्काळ कर्जमाफीची मागणी केली. यामुळे सभेत काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
हेही वाचा…राष्ट्रवादीचे माजी आमदार डॉ. अपूर्व हिरे भाजपमध्ये दाखल; नड्डांच्या निमंत्रणामुळे चर्चांना पूर्णविराम!
“ओसाड गावची पाटीलकी” विधानाने शेतकरी आक्रमक
शेतकऱ्यांनी कृषीमंत्री कोकाटे यांना त्यांच्याच एका जुन्या विधानाची आठवण करून दिली, ज्यामुळे शेतकरी आणि मंत्र्यांमध्ये जोरदार बाचाबाची झाली. काही दिवसांपूर्वी कोकाटे यांनी कृषिमंत्रीपद म्हणजे “ओसाड गावची पाटीलकी” असे विधान केले होते. याच विधानाचा संदर्भ देत शेतकऱ्यांनी आपल्या समस्यांकडे सरकारचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत तीव्र संताप व्यक्त केला.
हेही वाचा…पुण्यात अमित शाहंकडून बाजीराव पेशव्यांना मानवंदना: “एकही युद्ध न हरलेला एकमेव सेनापती!”
मंत्र्यांकडून शांततेचे आवाहन, पण शेतकऱ्यांचा रोष कायम
गोंधळ वाढल्यानंतर मंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांना शांततेचे आवाहन केले. “सरकार शेतकऱ्यांच्या बाजूने काम करत आहे,” असे आश्वासन देत त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, शेतकऱ्यांचा रोष कायम असल्याचे दिसून आले. या घटनेमुळे नाशिक जिल्ह्यातील शेतकरी संघटनांमधील वाढता असंतोष आणि त्यांच्या मागण्या पुन्हा एकदा ठळकपणे समोर आल्या आहेत.
ठाकरे पिता-पुत्राला सरनाईकांचे जेवणाचे निमंत्रण: शिंदे गटात चर्चांना उधाण!
ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर राणेंचा निशाणा: ‘स्वार्थासाठीची धडपड!
चित्रा वाघ संतापल्या, आरोपीला अटक करा! पुण्यात कुरिअर बॉयच्या वेशात येऊन तरुणीवर लैंगिक अत्याचार