मुंबई : राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना खूपच लोकप्रिय झाली, आणि त्याचा फायदा महायुतीला विधानसभेत देखील दिसून आला. याचवेळी लाडक्या बहीण योजनेत १५०० रूपयांवरून २१०० रूपयांपर्यंत वाढ करण्यात येण्याचे आश्वासन देण्यात आले होते. परंतु अद्यापही ते आश्वासन पाळलं गेलं नाही. यावरून माजी गृहराज्यमंत्री अनिल देशमुख यांनी राज्य सरकारवर जोरदार टिका केली आहे. त्यावर आता भाजपकडून त्यांना प्रत्युत्तर देण्यात आले आहे.
हेही वाचा…दावोसमध्ये महाराष्ट्राची विक्रमी गुंतवणूक..! इतक्या कोटींची झाली गुंतवणूक
राज्यात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने लाडक्या बहिणींना 2100 रुपये मानधन देण्याचे आश्वासन दिले होते. निवडणुका होऊन दोन महिने लोटले. आता शासनाला लाडक्या बहिणींचा विसर पडला आहे. त्यांच्या मानधनात वाढ करण्यासाठी कोणतीही हालचाल होतांना दिसत नाही. लाडक्या बहिणींना दिलेले आश्वासन शासनाने तत्काळ पूर्ण करावे. छाननीच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात लाडक्या बहिणींचे अर्ज बाद करण्यात येणार आहेत. असे झाल्यास आम्ही राज्यात मोठे आंदोलन उभे करू. असा इशारा अनिल देशमुख यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून दिला आहे.
हेही वाचा…ठाकरे गटाचे ४ आमदार अन् ३ खासदार फुटणार, बड्या नेत्याचा बडा दावा
अनिल देशमुख यांनी टिका केल्यानंतर त्यावर आता भाजपच्या आमदार चित्रा वाघ यांनी त्यांना खडेबोल सुनावले आहेत. सत्ता हातात आली नाही म्हणून भैसाटलेल्या अनिल देशमुखांनी पुन्हा एकदा खोटा नरेटीव्ह पसरवायला सुरूवात केली. अनिल देशमुख तुम्हाला लाडकी बहिण योजनेचं इतकं वावडं का…? असा सवाल चित्रा वाघ यांनी केला आहे.
तसेच निवडणुकीआधी तुम्ही लाडक्या बहिणींच्या विरोधात जात ज्यांनी योजना बंद करा. म्हणून न्यायालयाचा दरवाजा ठोठावला होता, त्यांना लाडक्या बहिणींबाबत बोलायचा नैतिक अधिकार आहे तरी का..? लक्षात ठेवा, महाराष्ट्रातल्या समस्त लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ म्हणजेच आमचे देवाभाऊ राज्याच्या मुख्यमंत्री पदी आहेत. त्यांना बहिणींच हित तुमच्यापेक्षा जास्त कळतं. त.टी.-पराभव जिव्हारी लागला आहे तर आरोप आणि अपप्रचारामुळे त्याची जखम भरून निघणार नाही.. असेही त्या म्हणाल्या.
वावडं आहे हे मात्र नक्की, पण महाराष्ट्राच्या जनतेची दिशाभूल करणाऱ्या देवकीच्या कंस रुपी भावाचे !!! खोटी आश्वासनं देऊन सत्तेत तर येता येते…पण ती पुर्ण करायची वेळ आली की पळता भुई थोडी होते आणि म्हणुनच रावणाची शूर्पणखा रुपी बहीण वादात उडी घेते. त.टी. – कपटाने तर कौरवांनी पण राज्य मिळवलं, पण कुरुक्षेत्रात अंतिम विजय कुणाचा झाला हे सांगायला नको. असे प्रत्युत्तर शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी चित्रा वाघ यांना दिले आहे.
वावडं आहे हे मात्र नक्की, पण महाराष्ट्राच्या जनतेची दिशाभूल करणाऱ्या देवकीच्या कंस रुपी भावाचे !!!
खोटी आश्वासनं देऊन सत्तेत तर येता येते…पण ती पुर्ण करायची वेळ आली की पळता भुई थोडी होते आणि म्हणुनच रावणाची शूर्पणखा रुपी बहीण वादात उडी घेते.त.टी. – कपटाने तर कौरवांनी पण… https://t.co/eK6fSM4QPz
— Adv Rohini Eknathrao Khadse (@Rohini_khadse) January 22, 2025
हेही वाचा…पोलिसांची कॉलर शरमेने खाली गेली, फडणवीस साहेब कधी जबाबदारी घेणार ?
हेही वाचा…बालेवाडीत होणार “भव्य अटलसेवा महाआरोग्य शिबीर”, मंत्री, आमदार, खासदार देखील राहणार उपस्थित
हेही वाचा…पालकमंत्र्यांचा तिढा मुख्यमंत्र्यांच्या दावोस दौऱ्यांनंतरच सुटणार का ?
हेही वाचा…मोठी बातमी…! वाल्मिक कराडला पुन्हा १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी