मुंबई : देशात आता ५ राज्यांमध्ये निवडणुकांचा बिगुल वाजला आहे. मतदान जरी वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये होणार असलं तरी पाचही राज्यांच्या निवडणुकांचा निकाल हा १० मार्च रोजी लागणार आहे. या पाचही राज्यांच्या निवडणुकांसाठी राजकारण चांगलेच पेटलेले दिसत आहे.
नागवडे सहकारी साखर कारखान्यात आमदार बबनराव पाचपुते गटाचा दारुण पराभव
महाराष्ट्रात सत्तेत असणारी शिवसेना आता भारतीय जनता पक्षाला इतरही राज्यांमध्ये कडवी झुंझ देण्याची शक्यता आहे. गोव्यामध्ये शिवसेना आपले उमेदवार देण्याच्या तयारीत आहे.स्वर्गीय मनोहर पर्रिकर यांचे चिरंजीव उत्पल पर्रिकर यांना भाजपने उमेदवारी द्यावी आणि इतर कोणताही पक्ष तिथं उमेदवार देणार नाही, ही मनोहर पर्रिकर यांना श्रद्धांजली ठरेल असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं होतं. त्यावरून आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी राऊत यांना शाब्दिक टोले मारले आहेत. पत्रकार सध्या संजय राऊत यांची वक्तव्ये जास्त चालवत असल्यामुळे राऊतांची हिंमत चांगलीच वाढली आहे.
“चंद्रकांत पाटील हे काही राजकीय चर्चेचे केंद्रबिंदू नाहीत, त्यांच्या बोलण्याने फरक पडत नाही”
मनोहर पर्रिकर यांच्या मुलाविषयी बोलायची त्यांना गरज काय ? तुमचे गोव्यात ऐकायला कोण बसले आहे ? एवढीचं हिंमत असेल तर संजय राऊत यांनी गोव्यातील एखादा मतदारसंघ निवडावा आणि तिथून निवडणूक लढवून दाखवावी. पंतप्रधान नरेंद्र मोदी जसे गुजरातमधून जातात आणि उत्तर प्रदेशात लढतात तसं तुम्ही देखील लढवून दाखवा. आपच्या पक्षाकडे अध्यक्ष आहे, पण बाकीच्या पक्षांना अध्यक्ष ठरवण्याची सवय नाही. मनोहर पर्रिकरांच्या मुलाला जर भाजपने तिकीट दिले तर तुम्ही इतर पक्ष निवडणूक लढवणार नाही हा शब्द द्या असं आव्हान देखील चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे.
Read also:
- नाना पटोलेंची भाषा आक्षेपार्ह, त्यांना तात्काळ अटक करा; नितीन गडकरी, नारायण राणे आक्रमक
- काँग्रेस हा लोकशाहीतील राजकीय पक्ष की दहशत पसरविणारे संघटन? पटोलेंच्या वक्तव्यावर फडणवीसांचा संताप
- मी मोदीला मारु शकतो आणि शिव्याही देऊ शकतो; नाना पटोलेंचे आक्षेपार्ह वक्तव्य
- ५ वर्ष न केलेल्या कामाचं अपयश ते लुंगीमागे लपवत आहे; शिवेंद्रराजेंची उदयनराजेंच्या डान्सवर प्रतिक्रिया
- मेट्रोची पाहणी करायला शहरात शरद पवार आले, महापौरांना नाही बोलवले