महाजॉब्स पोर्टलच्या जाहिरातीत केवळ शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांचे फोटो असल्याने, सत्यजीत तांबे यांनी सवाल उपस्थित केला आहे. “महाजॉब्स ही योजना महाराष्ट्र विकास आघाडी सरकारची आहे, की शिवसेना-राष्ट्रवादीची? किमान समान कार्यक्रमाची अंमलबजावणी का होत नाही”, असे प्रश्न सत्यजीत तांबे यांनी विचारले आहेत.
युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी ट्विटरवरुन व्यक्त केलेल्या नाराजीवरुनही निरुपम यांनी भाष्य केले. महाजॉब्स पोर्टलच्या जाहिरातीचा फोटो ट्विट करत त्यांनी महाराष्ट्र सरकारमध्ये काँग्रेस सहभागी आहे असं ऐकलं ना? मग युवकांना रोजगार देणाऱ्या सरकारी जाहिरातीत काँग्रेस कुठे आहे? ज्या काँग्रेस नेत्यांना शिवसेनेवर अथांग प्रेम झालं आहे. त्यांना माझे प्रश्न आहेत. शिवसेनेसमोर लोटांगण घालण्यापेक्षा त्यांच्याशी लढा अन्यथा पक्ष संपून जाईल असा दावा संजय निरुपम यांनी केला आहे.
महाराष्ट्र सरकार में कॉंग्रेस भी शामिल है।ऐसा सुना है न?
युवाओं को रोज़गार देने के सरकारी विज्ञापन में कॉंग्रेस कहाँ है?
जिन कॉंग्रेस नेताओं को शिवसेना से अगाध प्रेम हो गया है, उनसे मेरा सवाल है।
शिवसेना के सामने लोटाँगण करने से बेहतर है, इससे लड़िए।
वरना पार्टी खत्म हो जाएगी। pic.twitter.com/swql0SfgKZ— Sanjay Nirupam (@sanjaynirupam) July 16, 2020