औरंगाबाद : भाजपच्या दोन्ही केंद्रीय राज्यमंत्र्यांवर गुन्हे दाखल करा अशी मागणी एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी केली आहे. भाजपच्या जनशीर्वाद यात्रेतील कार्यकर्ते आणि पदधिकाऱ्यांची मोठी गर्दी होत आहे. जनशीर्वाद यात्रेतील गर्दी प्रकरणी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि भागवत कराड यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे.
रोहित पवारांनी राज ठाकरेंचे ‘कौतुक’ करत काढला भाजपला चिमटा, म्हणाले…
मराठवाड्यात रावसाहेब दानवे आणि भागवत कराड यांच्या जनआशीर्वाद यात्रेतील कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांची मोठी गर्दी होत आहे. याच प्रकरणी मंत्र्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी जलील यांनी केली आहे. तसंच एमआयएमवर गुन्हे दाखल करता मग मंत्र्यांवर देखील गुन्हे दाखल करा असा सवाल देखील त्यांनी पोलिस प्रशासनाला केला आहे.
भाजपच्या ‘जन आशिर्वाद’ यात्रेची पोलखोल करणार; राष्ट्रवादीने दंड थोपटले
खासदार जलील म्हणाले, माझ्याकडे एक विडियो आहे. या विडियोमध्ये केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच स्वागत करताना अनेक मंत्री दिसून येत आहेत. यामध्ये दानवेयांनी मोठी गर्दी जमावली आहे. तसेच दुसरे मंत्री भागवत कराड यांच्याही जन आशीर्वाद यात्रेमध्ये मोठी गर्दी होती. परवा स्वातंत्र्यदिनाला आम्ही आंदोलन केलं. पालकमंत्र्यांना काळे झेंडे दाखवले. आमच्या स्वार्थासाठी ते आंदोलन नव्हते. जिल्ह्याच्या विकासासाठी ते आंदोलन होतं.
“भाजपाचं म्हणजे, मी नाही त्यातली आणि…”, पिंपरी-चिंचवड पालिका भ्रष्टाचारावरून शिवसेनेचा खोचक टोला!
त्या नंतर माझ्यासह माझ्या २४ कार्यकर्त्यांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मग आता मला पोलिसांना विचारायचंय, की आमच्यावर फटाफट गुन्हे दाखल करता मग आता भाजपच्या राज्यमंत्र्यांवर गुन्हे दाखल करणार का? आणि करणार नसाल तर का करणार नाही?”, असा सवाल इम्तियाज जलील यांनी औरंगाबाद पोलिस प्रशासनाला केला आहे.
Read Also :
- उद्धव ठाकरेंनी सोनिया गांधींना सांगितली ‘मनातली गोष्ट’! राऊतांचा गौप्यस्फोट
- न्यायासाठी संजीवनी काळेंनी ठोठावले ‘कृष्णकुंज’चे दरवाजे, घेतली शर्मिला ठाकरेंची भेट!
- लाच प्रकरण: सभापती नितीन लांडगे यांचा जामीन फेटाळला; राष्ट्रवादीचे ४ अन् शिवसेनेच्या २ नगरसेवकांची होणार चौकशी!
- …अन् उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वत: कचरा उचलला; काय झालं नेमकं…!
- भाजपची जन आशीर्वाद यात्रा वादाच्या भोवऱ्यात; मुंबई पोलिसांकडून तब्बल ३६ गुन्हे दाखल