पुणे : पुणे महापालिका हद्दीत नव्याने समाविष्ट झालेल्या २३ गावांचा पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची (पीएमआरडीए) प्रारूप विकास आराखडा राज्य शासनाने मंजूर केला आहे. पुणे महानगर विकास प्राधिकरण व महानगर नियोजन समितीची बैठक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी या प्रारूप विकास आराखड्याच्या प्रसिद्धीसाठी त्यांनी मान्यता दिली. त्यामुळे, या गावांच्या विकासाचा मार्ग सुकर झाल्याचे मत महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी व्यक्त केले आहे़.
पुणे महानगर नियोजन समितीची बैठक पुन्हा पुढे ढकलली; विकास आराखडा लांबणीवर
याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी, पीएमआरडीए व राज्य सरकारचे आभार मानत विकास आराखडा मंजुरी ही राज्यातील पहिली घटना असल्याचे सांगितले़ एखादे गाव महापालिकेत समाविष्ट झाले असतानाच लागलीच तेथील नागरिकांना क्रीडांगणे, उद्याने, शाळा, रस्ते यांचा लेखाजोखा मिळाला आहे़. त्यामुळे या गावांच्या विकासाला लागलीच सुरूवात होणार आहे़ या निर्णयामुळे या २३ गावांच्या विकासाला चालना मिळाली असल्याचे सांगितले़.
पुण्यातील रिंगरोडमुळे २५ टक्के प्रदूषणात घट; बाहेरून येणारी ६० ते ७० हजार वाहने कमी होणार
या विकास आराखड्यात २ रिंगरोड, हायस्पीड रेल्वे व क्रिसेंट रेल्वे, १० मेट्रो मार्गिका, १३ मल्टी मॉडेल हब, ४ प्रादेशिक केंद्रे, १५ नागरी केंद्रे, १२ लॉजिस्टिक केंद्रे, ५ पर्यटन स्थळ व ३ सर्किट्स, ५ शैक्षणिक केंद्रे, २ वैद्यकीय संशोधन केंद्रे व ७ अपघात उपचार केंद्रे, जैव विविधता उद्यान, कृषी प्रक्रिया संशोधन व विकास केंद्रे, १ क्रिडा विद्यापीठ, ८ ग्रामीण सबलीकरण केंद्रे, ५९ सार्वजनिक गृह प्रकल्प, २६ नगर रचना योजना, ४ कृषि उत्पन्न बाजार केंद्रे, ५ प्रादेशिक उद्याने, ८ जैव विविधता उद्याने व १६ नागरी उद्याने, ४ अक्षय उर्जा निर्मिती केंद्रे, ३० अग्निशमन केंद्रे, २ औद्योगिक संशोधन व प्रशिक्षण केंद्र, १ व्यवसाय केंद्र असा महत्वाचे प्रकल्प प्रस्तावित करण्यात आले आहेत.
महापालिका रणधुमाळी : भाजपने काय केले याची पोलखोल करा, राज ठाकरेंचे आदेश
काँग्रेसचे महापालिकेतील गटनेते आबा बागुल यांनी २३ गावांचा प्रारूप विकास आराखडा समितीकडे सादर झाल्याने, २३ गावांच्या विकासाचा मार्ग मोकळा झाला असल्याचे सांगितले़ लवकरात लवकर या २३ गावांमधील हरकती सूचना घेऊन, त्वरित विकास करावा, ही गावे आपण घेतली पण त्याचे गावपण जपण्याची संधी या निर्णयामुळे लोकप्रतिनिधींना मिळाली असल्याचेही ते म्हणाले़. दरम्यान, पुणे महानगर विकास प्राधिकरणाच्या प्रारूप विकास आराखड्यानुसार नागरिकांना राहण्यायोग्य असे सर्वोत्तम महानगर विकसीत करण्यासाठी प्रयत्न करा. ही कामे करताना त्या भागात अनधिकृत बांधकामे होणार नाहीत याची दक्षता घ्यावी, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले.
Read Also :
- आपलाच पेपर अन् आपलीच जाहिरात; ८८ पानी पेपर छापून सामनाने मुख्यमंत्र्याच्या आवाहनाला दाखवली केराची टोपली
- मोठी बातमी: राजकीय हालचालींना वेग, प्रशांत किशोर बनणार सोनिया गांधींचे सल्लागार?
- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज कोल्हापूर दौऱ्यावर; पूरग्रस्त भागाची करणार पाहणी!
- मनी लाँड्रिंग प्रकरणी: अनिल देशमुखांच्या संरक्षण मिळण्याच्या याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात होणार सुनावणी
- पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांसाठी ‘एनटीए’कडून जेईई परीक्षा प्रवेशपत्रे जारी; ३ व ४ ऑगस्ट रोजी होणार परीक्षा