मनसेचे वसई जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्यावर महापालीका आयुक्तांना शिवीगाळ करून आयुक्त्यांच्या दालनाबाहेर राडा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पालिकेने शहरांतील वाढत्या रुग्णांसाठी उपचार म्हणून वाचीव कोवीड सेंटर सुरू करण्यात आले. मात्र याठिकाणी रुग्णांचा जीवघेणा छळ होत असल्याच्या तक्रारींमुळे मनसेने मंगळवारी दुपारी वसई विरार महापालिका मुख्यालयात आयुक्तांच्या दालनाबाहेर ऱाडा करून प्रसंगी पालिका आयुक्तांना गलिच्छ मराठमोळ्या शिव्यांची लाखोली वाहिल्याचा निंदनिय प्रकार घडला होता. या प्रकरणी विरार पोलिसांनी मंगळवारी उशिरा मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्यासह त्यांच्या समवेत सहभागी असणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांच्या विरोधात सार्वजनिक मालमत्तेचे विद्रुपीकरण केले तसेच अन्य विविध कलमांसह गुन्हा दाखल केल्याची माहिती जनसंपर्क पोलीस अधिकारी यांनी दिली.
मनसेचे ठाणे व वसई विरार जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी मंगळवारी दुपारी आपले निवडक पदाधिकारी वितेंद्र पाटील, जयेंद्र पाटील, प्रवीण राऊत आदि मनसे कार्यकर्त्यांसह पालिका आयुक्त तथा प्रशासक गंगाथरन डी यांच्या भेटीसाठी पालिका मुख्यालयात गेले होते. मात्र, फक्त दोनच कार्यकर्त्याना आपल्या दालनात पाठवण्याचे आदेश आयुक्तांनी दिल्यामुळे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव हे संतापले व तिकडेच दालनाबाहेर आक्रमक झाले होते.