नवी दिल्ली : फेब्रुवारी महिन्यात दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. त्याआधी दिल्लीतील राजकीय वातावरण सध्या चांगलेच तापले आहेत. त्याआधी मात्र मणिपुरमध्ये एनडीएला मोठा धक्का बसला आहे. कारण याठिकाणी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या जदयूने आपला एनडीएला दिलेला पाठिंबा काढून घेतला आहे. त्यामुळे आगामी काही दिवसात काय घडामोडी घडणार ? त्याची उत्सुकता सगळ्यांना लागून राहिली आहे.
हेही वाचा…मोठी बातमी…! वाल्मिक कराडला पुन्हा १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
मणिपूर येथील जदयू प्रदेशाध्यक्ष वीरेंद्र सिंह यांना अध्यक्षपदावरून हटविण्यात आले आहे. या पत्रात त्यांनी बीरेन सिंह यांच्या नेतृत्वातील भाजप सरकारचा पाठिंबा काढून घेत असल्याचे जाहीर केले होते. २०२२ पासून जेडीयु आणि भाजपची युती होती. एकूण ६० जागांपैकी भाजप ३२ जागाचं बहुमत आहे. जेडीयुच्या ६ पैकी ५ आमदारांनी याआधी भाजपला पाठिंबा दिला होता. त्यामुळे भाजप सरकारचे संख्याबळ वाढले होते. त्यानंतर जेडीयुचा एकच आमदार शिल्लक होता. त्यानंतर आता त्या आमदाराने देखील आपला पाठिंबा काढून घेण्याचा निर्णय घेतला आहे.
हेही वाचा…दावोसमध्ये महाराष्ट्राची विक्रमी गुंतवणूक..! इतक्या कोटींची झाली गुंतवणूक
दरम्यान, बिहारमध्ये याच वर्षी ऑक्टोबरमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. अशावेळी नितीश कुमार यांच्या पक्षाने घेतलेला निर्णय भाजपावर दबावाचं तंत्र वापरण्यासाठी घेतला गेला का ? अशीही चर्चा सुरू झाली होती. परंतु या पाठिंबा काढून घेण्याच्या निर्णयाला नितीश कुमारांची संमती नव्हती हे आता समोर येत आहे.
हेही वाचा…“भैसाटलेले, रावणाची शूर्पणखा रुपी बहीण”, चित्रा वाघ अन् रोहिणी खडसेंमध्ये जोरदार खडाजंगी
हेही वाचा…पोलिसांची कॉलर शरमेने खाली गेली, फडणवीस साहेब कधी जबाबदारी घेणार ?
हेही वाचा…बालेवाडीत होणार “भव्य अटलसेवा महाआरोग्य शिबीर”, मंत्री, आमदार, खासदार देखील राहणार उपस्थित
हेही वाचा…पालकमंत्र्यांचा तिढा मुख्यमंत्र्यांच्या दावोस दौऱ्यांनंतरच सुटणार का ?