पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये आज मध्यरात्री पासून पुन्हा एकदा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. आज म्हणजेच १३ जुलै मध्यरात्रीपासून ते २३ जुलैपर्यंत हा लोकडाऊन चा कालावधी असणार आहे. या लॉकडाऊन मध्ये पाळण्यात येणाऱ्या सूचनांची नियमावली देखील प्रशासनाने जाहीर केली आहे. दूध, मेडिकल आणि अत्यावश्यक सेवा वगळता सर्व काही या कालावधी मध्ये बंद सोनार आहे तर १४ जुलै ते १८ जुलै संपूर्णतः लॉकडाऊन असेल असेही प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. या लॉकडाऊन बाबत आमदार महेश लांडगे यांनी आपले मत व्यक्त केले आहे.
‘उद्यापासून चालू होणाऱ्या लॉकडाऊनमध्ये प्रशासनाने केलेल्या सूचनांचे पालन करावे’, असे आवाहन आमदार महेश लांडगे यांनी नागरिकांना केले आहे. “हा लॉकडाऊन दोन टप्प्यात असणार आहे तरी तुम्ही काटेकोर पणे पाळावा. हा लॉकडाऊन कोरोनाची साखळी तोडण्यासाठी करण्यात आला आहे. या लॉकडाऊनचे तुम्ही जनता कर्फ्यू सारखे पालन करावे. तुमच्या मदतीने आपण या कोरोनाला हरवू शकतो आणि या कोरोनाची साखळी तोडू शकतो. त्यामुळे माझी विनंती आहे सगळ्यांनी प्रशासनाच्या आदेशांचे पालन करावे.” असे आवाहन महेश लांडगे यांनी केले आहे.
तसेच “हे शहर सुरक्षित ठेवण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत. या कोरोनातून आपले शार अणे या शहरातील देशातील नागरिक सुखरूप बाहेर पडावा हे आपलं कर्तव्य आहे. त्यासाठी आन या लोकडाऊनचे पालन करावे कुठेही गर्दी करून नये प्रशासनच्या आदेशनाचे पालन करावे. तसेच या लोकडाऊन मध्ये आपण प्रशासनाला मदत करणार आणि कोरोनाची साखळी तोडणार याची मला खात्री आहे”, असेही महेश लांडगे म्हणाले
तसेच आमदार लांडगे यांनी कोरोना झालेल्या व्यक्तींना लांब करू नका त्यांच्याशी चंगळणाने वागा त्यांची विचारपूस करा असे सांगितले आहे. “कोरोना झालेल्या व्यक्तीपासून आपण सावध राहिलेच पाहिजे पण त्यांच्याकडे तुच्छतेने न पाहता आपण त्यांचे या कोरोनाशी कधी करण्यासाठी मनोधैर्य वाढविले पाहिजे. डॉक्टर हे या रुग्णांना कोरोनामधून बाहेर येणास मदत करतच असतात.. आपणही अशा व्यक्तींना फोन करून त्यांची विचारपूस करून त्यांना मानसिक तणावातून मुक्त करू शकतो.” असेही आव्हान त्यांनी नागरिकांना केले आहे